शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

रोहणीखेडा शिवारातील खोदकामात मिळाली तांब्याची ४०४ नाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 19:58 IST

Amravati Update : एका शेतात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चर खोदण्याचे काम सुरू असताना, एका मजुराला एका मडक्यात तांब्याची यात नाणी मिळाली.

अमरावती  - धारणी तालुक्यातील रोहणीखेडा शिवारात एका शेतात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चर खोदण्याचे काम सुरू असताना, एका मजुराला एका मडक्यात तांब्याची यात नाणी मिळाली. ती नाणी महसूल व पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली असून, पुढील कारवाईकरिता ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.तालुका मुख्यालयापासून सात किमी अंतरावर असलेल्या रोहणीखेडा शिवारात बुढा तोट्या दहीकर यांचे टेकडीवर शेत आहे. त्या शेताच्या बांधावर चर खोदकाम सुरू होते. त्या कामाकरिता गावातील १८० मजुरांची उपस्थिती होती. मजूर रघुनाथ सोमा जावरकर व त्याची पत्नी खोदकाम करत असताना, त्यांना मातीच्या मडक्यातून मातीने माखलेली तांब्याची नाणी मिळाली. त्या दोघांनी ती नाणी कोणालाही माहिती होऊ न देता पिशवीमध्ये भरली व काम संपल्यावर ते दोघेही घराकडे पळायला लागले. अन्य मजुरांनी त्या दाम्पत्याला पिशवीत काय नेत आहे, हे वारंवार विचारले. पण, त्यांनी सांगण्यास नकार दिला. त्यातीलच एका मजुराला संशय आल्याने त्याने आणखी १५ मजुरांना घेऊन पुन्हा खोदकाम सुरू केले. तेथे त्याला एक नाणे मिळाले. त्यावरून रघुनाथला नाणी मिळाल्याची कल्पना मजुरांना आली. याबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले.पिशवीत ४०३ नाणीघटनास्थळावर नायब तहसीलदार अनिल नाडेकर व सराफ धुर्वे यांनी भेट देऊन एका मजुराला मिळालेले ते नाणे ताब्यात घेतले आणि गावात जाऊन रघुनाथचा शोध घेतला. रघुनाथने ती नाण्याची पिशवी छपराच्या लाकडाला बांधून ठेवली होती. त्यातील नाण्याचे मोजमाप केले असता, ती ४०३ नाणी भरली. एकूण ४०४ नाणी महसूल प्रशासनाने आयपीएस तथा ठाणेदार निकेतन कदम यांच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये ठेवली आहे.

नाण्यांवर उर्दू लिपीजमिनीत असल्याने नाण्यांवर मातीचा घट्ट थर आहे. त्यावर उर्दू अक्षरात लिखाण केले असून, ती मुगलकालीन नाणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ती नाणी पोलीस प्रशासन सोमवारी धारणी येथील कोषागार कार्यालयात जमा करणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे ती सोपविली जातील. यानंतर ती नाणी ही किती वर्षांपूर्वीची, याचा उलगडा होणार आहे.

मजुरांना मिळालेली ४०४ तांब्याची नाणी महसूल प्रशासनाने आमच्याकडे सोपविली. ती नाणी कोषागार कार्यालयात जमा करण्यात येतील. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.- निकेतन कदम, ठाणेदार, धारणी

टॅग्स :Amravatiअमरावती