शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

१३० दिवसांत ४,०२४ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर २१ एप्रिलला पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतरच्या १३० दिवसांत चार हजारांवर रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या नोंद होणारे ८० टक्के रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. त्यामुळे चार दिवसांच्या उपचारानंतर कुठलेही लक्षण नसल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१,२८९ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण : जिल्ह्यात महिनाभरात ३,८८७ संक्रमितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आतापर्यत चार हजारांवर कोरोनाग्रस्तांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आल्याची सुखद वार्ता आहे. सध्या १२८९ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या कित्येक पटींनी जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. या महिनाभरात कोरोनाची ‘पीक’ स्थिती असल्याने तब्बल ३७०० रुग्णांची नोंद झाली, ही मात्र, चिंतेची बाब आहे.जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर २१ एप्रिलला पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतरच्या १३० दिवसांत चार हजारांवर रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या नोंद होणारे ८० टक्के रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. त्यामुळे चार दिवसांच्या उपचारानंतर कुठलेही लक्षण नसल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस मात्र होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. याशिवाय असिम्प्टमॅटिक रुग्णांसाठी आता होम आयसोलेशनची सुविधादेखील उपलब्ध आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यत ४५० रुग्णांनी या सुविधेचा फायदा घेतला आहे.संक्रमितांच्या वाढत्या संख्येमुळे आता कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या वर्गीकरणात दाखल करण्यात येत आहे; तथापि काही लक्षणविरहीत रुग्णांच्या घरी योग्य सुविधा असल्यास त्यांना त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशनची सुविधा देण्यात येत आहे. यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणे असल्याबाबत प्रमाणित केले असावे. त्यांच्या घरी विलगीकरणासाठी व कुटूंबातील व्यक्तींच्या विलगीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, ही अट आहे. यासह अन्य कागदपत्रांची पुर्तता त्यांना करावी लागते. याशिवाय आरोग्य विभागाच्या हेल्पलाईनद्वाराही फोनद्वारे त्यांच्याशी सातत्याने संपर्क करण्यात येतो.आतापर्यत ३६ हजारांवर चाचण्या निगेटिव्हजिल्ह्यात २८ ऑगस्टपर्यत ४२ हजार ४३९ कोरोना संक्रमण चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३६१५१ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७६६ अहवाल प्रतीक्षेत आहेत. २३९ अहवाल पुन्हा पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय ट्रुनेटद्वारा आलेलेले ७५ अहवाल हे आरटी-पीसीआर तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक २७०३० चाचण्या आरटी-पीसीआर आहेत. खासगी लॅबद्वारा ३६०, रॅपीड अ‍ॅन्टीजेनद्वारा महापालिका क्षेत्रात १०,३२९ व जिल्हा ग्रामीणमध्ये ४३३३,याशिवाय ट्रुनेट मशीनद्वारा ३८७ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्णऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ग्रामीणमध्येही याच महिन्यात संक्रमितांची संख्या वाढायला लागली. १ ऑगस्टला जिल्ह्यात २१५७ संक्रमितांची नोंद होती. २९ आॅगस्टला ही संख्या ५४४० वर पोहोचली. या महिन्यात सरासरी १३० वर संक्रमितांची नोंद झाली. एकाच दिवशी सर्वाधिक २०६ रुग्णसंख्येचा उच्चांकही याच महिन्यातील आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या