शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

40 टक्के एसटी बस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही चालूच आहे. परिणामी जिल्ह्यात ६० टक्के वाहतूक अद्यापही बंद आहे. तर ४० टक्के  वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील ८ आगारांमध्ये ३६३ पैकी आजघडीला १२७  गाड्या ४१४  फेऱ्या मारत आहेत.नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली. अमरावती आगारातून सध्या ३३, बडनेरा १२, परतवाडा १५, वरूड १६, चांदूर रेल्वे १७, दर्यापूर १०, मोर्शी १७, चांदूर बाजार ०८, अशा एकूण १२७  गाड्या  धावू लागल्या आहेत. दररोज या गाड्यांची सुमारे २९ हजार ७७१   किलोमीटरचा प्रवास करीत आहे.  त्यामध्ये सरासरी दररोज २२ हजार ६६० प्रवासी प्रवास करीत आहेत. यापूर्वी दररोज सरासरी ३५ लाखांचे उत्पन्न सध्या २० लाखावर आले आहे. त्यामुळे नेहमी तोट्यातच असणारी एसटीचा पुन्हा तोट्यातच चाके आहेत.   कामगार हजर न झाल्याने एसटी प्रशासनाकडून आतापर्यंत ४५० निलंबन कारवाई करण्यात आली आहे. निलंबितांपैकी  काही जण कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे   त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.  विशेष म्हणजे १३००  कर्मचारी आजही आपल्या मागणीवर ठाम असून ते कामावर रुजू झाले नाहीत.  त्यामुळे खासगी चालक कंत्राटी  पद्धतीने घेऊन बसेस चालविलेल्या जात  आहेत. 

खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीजिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटी वाहतूक सुरू झाली नाही.  त्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. काही भागात ऑटो रिक्षा, टॅक्सीचालक,टॅव्हल्सचालक मनमानी  दराने भाडे घेऊन प्रवाशांची लूट करीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणे प्रवाशांसाठी आवश्यक आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप