शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० आरोग्य केंद्र डॉक्टरांविना पोरके; एमबीबीएसची पदे रिक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:37 IST

रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने तयार केलेले धोरण कुचकामी ठरत आहे. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र  डॉक्टरविना पोरकी आहेत.

- मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासनाने तयार केलेले धोरण कुचकामी ठरत आहे. जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्र  डॉक्टरविना पोरकी आहेत. आरोग्यसेविका परिचर हे बाह्यरुग्ण तपासणी करीत असल्याचे दारुण चित्र या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे.खासगी दवाखान्यातील उपचाराची पद्धत महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्ण सरकारी दवाखान्याकडे वळतात. जिल्ह्यात मात्र या प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती अत्यंत बिकट आहे. ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रात ४० एमबीबीएस डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. ही पदे दोन वर्षांपासून भरली नसल्याने आरोग्यसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एमबीबीएस डॉक्टरांना अपेक्षेपेक्षा कमी वेतन मिळत असल्याने हे डॉक्टर अनेक ठिकाणी सेवेत रुजू होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

आरोग्यसेविकेची सव्वादोनशे पदे रिक्त डॉक्टरांनी सांगितलेले उपचार व रुग्णांवर निगराणी ठेवण्याचे काम आरोग्यसेविकेकडे असताना जिल्ह्यात तब्बल ही २२२ पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका नसल्याने शासनाच्या विविध आरोग्यविषयक उपक्रमावर याचा परिणाम होत आहे. ग्रामीण भागात वेळेवर रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आरोग्य विभाग रुग्णांच्या जिवाशी खेळत असेल तर सर्वसामान्य रुग्णांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील शिसोदे यांनी केला.प्रतिनियुक्तीत घोळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने ज्या उपकेंद्रात आरोग्य सेविका नाहीत, तेथे नजीकच्या उपकेंद्रातील तथा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका प्रतिनियुक्तीवर देण्याचे आदेश मिळतात. मात्र, प्रतिनियुक्ती केवळ एक महिन्यात  बदलविण्यात येत असल्याचे अनेक प्रकार आरोग्य विभागात घडत आहे. आर्थिक देवाणघेवाणीचा फटका इमानेइतबारे आरोग्यसेवा देणाºया सेविकांना बसत असल्याची ओरड आहे.

उपचारासाठी आर्थिक दंडपरिसरातील नागरिकांना डॉक्टरांअभावी सेवा मिळत नाही. नागरिकांना उपचारासाठी आर्थिक दंड सोसत खासगी रुग्णालयाचे तोंड नाईलाजास्तव पहावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाºयांना तसेच लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी तक्रारी देऊनही आश्वासनापलीकडे काहीच हाती न लागल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

जिल्ह्यात गट 'अ'च्या ४० वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. नजीकच्या गट 'ब' संवर्गातील वैद्यकीय अधिकाºयांच्या सेवा त्यासाठी घेण्यात येत आहे. पदभरती घेण्यात आली. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- सुरेश असोले,जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

टॅग्स :doctorडॉक्टरAmravatiअमरावती