शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

गेल्या सहा वर्षांत केली ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या

By admin | Updated: January 13, 2015 22:53 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि १२० योजनांच्या अधिभाराने माणसीक तणावात आहे. मागील सहा वर्षात विदर्भातील ४० ग्रामसेवकांनी

मोहन राऊ त - धामणगाव रेल्वेग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि १२० योजनांच्या अधिभाराने माणसीक तणावात आहे. मागील सहा वर्षात विदर्भातील ४० ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्यानंतर ४८ जनांवर केवळ आकसापोटी प्रााणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती आहे़ नवीन सरकारकडून न्याय मिळण्याची अपेक्षा या ग्रामसेवकांनी व्यक्त केली आहे़अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या पाच जिल्ह्यात ३ हजार १३० तर नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यात ४ हजार २२४ ग्रामसेवक कार्यरत आहे़ या विदर्भातील गावाच्या विकासात ग्रामसेवकांचा मोठा मोलाचा वाटा असतो. घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यापासून तर गावातील स्वच्छता, आरोग्य, ग्रामसभा घेणे असे विविध कामे ग्रामसेवकांना सांभाळावी लागतात. मात्र, एकाच ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा अधीभार असल्यामुळे या ग्रामसेवकाला अधीक मानसिक व शारीरिक ताण दररोज सहन करावा लागतो़ पूर्वी गावातील मोजकी कामे या ग्रामसेवकाकडे होती़ आता तब्बल केंद्र व राज्य शासनाच्या १२० योजनांची ग्रामीण स्तरावरील योजनांची माहिती तसेच पाठपुरावा करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर आली आहेत़ दररोज मंत्रालयातून निघालेला शासकीय अध्यादेश जि़प़ व पंचायत समितीपर्यंत पोहोचताच त्याच दिवशी माहिती मागण्याचे कार्य वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने ग्रामसेवकांना अडचणीला सामोरे जावे लागते़ ग्रामसेवक तांत्रिक दृष्टीने नसताना त्यांच्याकडून ग्रामस्तरावर बांधकाम करून घेतल्या जाते़ पूर्वी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीत कामाचा ठराव घेऊन वरिष्ठ विभागाला पाठविण्याचे काम होते़ परंतु आता थेट महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसारख्या कामाची जबाबदारी ग्रामसेवकावर आली आहे़ एकीकडे गावात दोन गटात निर्माण होणारे तंटे तर दुसरीकडे बांधकाम सारखा विभाग ग्रामसेवकाकडे दिल्याने ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याची आपली कैफियत ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे व तालुकाध्यक्ष नरेंद्र चौधरी तसेच जयंत खैर यांनी मांडली़जिल्ह्यातील १८ ग्रामसेवक सेवा निवृत्त होऊनही त्यांना निवृत्ती वेतन अद्यापही मिळत नाही़ जिल्हा परिषद हा विभाग ग्रामसेवक ज्या गावातून सेवा निवृत्त झाला त्या गावातील कामाचे नाहरकत प्रमाणपत्र मागते़ सदर प्रमाणपत्र देण्यास पंचायत समिती अनेक महिने लावत असल्यामुळे या सेवा निवृत्त ग्रामसेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येत असल्याचे युनियनचे विभागीय उपाध्यक्ष बबन कोल्हे यांनी सांगीतले़ दरवेळी शासनाकडे अनेक मागण्या ठेवल्या असता केवळ एकच मागणी पूर्ण करण्यात येते़ ग्रामविकासासाठी कोणताही भेदभाव न करता आपले कार्य जोमाने करणारा ग्रामसेवकाला कोणतेही संरक्षण नाही़ गावातील राजकीय पुढाऱ्यांनी खोटी तक्रार केली तरी वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात येते़ कोणताही ठोस पुरावा नसताना ग्रामसेवकाला निलंबित करण्यात येत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे़ असे जिल्हा युनियनचे विलास बिरे यांनी आपले मत व्यक्त केले़ एक ते दोन हजार लोकसंख्येच्या मागे एका ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते़ १५ हजार लोकसंख्येच्या गावासाठी ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात येत।. आज प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती सोबत वेतन श्रेणी मिळते, परंतु राज्यातील एकमेव ग्रामविस्तार अधिकाऱ्यांचे हे पद आहे़ ११० ग्रामविकास अधिकारी आजही वेतन श्रेणीपासून वंचित आहे़