शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ॲप डाऊनलोड करताच ४.८२ लाख गायब; धारणीच्या वृध्देची फसवणूक, वीज पुरवठा खंडितची बतावणी

By प्रदीप भाकरे | Updated: February 5, 2023 13:29 IST

थकीत देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून धारणी येथील एका वृध्देची ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

अमरावती:

थकीत देयक न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची बतावणी करून धारणी येथील एका वृध्देची ४ लाख ८२ हजार ६४८ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ३ ते ४ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी, धारणी पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी अज्ञात मोबाईलधारकाविरूध्द गुन्हा दाखल केला.धारणीलगतच्या दुणी येथील ६२ वर्षीय महिला ही सेवानिवृत्त असून तिचे धारणीच्या एसबीआयमध्ये खाते आहे. त्यात निवृत्तीलाभासह अन्य काही रक्कम देखील जमा आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने वृध्देला कॉल केला. आपण पुणे येथील एमएसईबीमधून बोलत असून, थकीत इलेक्ट्रिक बील भरले नाही, तर वीज पुरवठा खंडित केल्या जाईल, असे सांगून बिल ऑनलाईन भरण्यास सांगितले. त्यावर आपल्याला ऑनलाईन पैसे भरता येत नसल्याचे वृध्देने सांगितले. त्यावर आरोपीने मोबाईलवर महावितरण, टीम व्हीवर, क्विक सपोर्ट, एसएमएस फॉरवर्डर आणि महा मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे वृध्देने ते ॲप डाऊनलोड करताना एसबीआयधील बॅंक खात्याची माहिती दिली. त्याचवेळी त्यांच्या खात्यातून ४ लाख ८२ हजार ६४८ रुपये परस्परच डेबिट झाले. ती रक्कम डेबिट झाल्याचे बँक स्टेटमेंट वरुन त्यांना कळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धारणी पोलीस ठाणे गाठले.