शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ३७६ कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाच्या नव्या आक्रमणाने अमरावती हैराण झाले आहेत. शनिवारी ३७६ कोरोनाग्रस्तांचे निदान झाले. १० फेब्रुवारीपासून सातत्याने ३०० हून ...

अमरावती : कोरोनाच्या नव्या आक्रमणाने अमरावती हैराण झाले आहेत. शनिवारी ३७६ कोरोनाग्रस्तांचे निदान झाले. १० फेब्रुवारीपासून सातत्याने ३०० हून अधिक रुग्ण चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. जिल्हा २५ हजार रुग्णसंख्येच्या निकट पोहोचला आहे.

अमरावती जिल्ह्यात जानेवारीच्या अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांचा पॉझिटिव्ह अहवाल शंभराच्या आत होता. कोरोना आता संपणार, असे दिलासादायक चित्र असताना फेब्रुवारीमध्ये अचानक कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उचल खाल्ली. प्रथम शंभरावर, त्यानंतर दीडशतकी, दोन शतकी व आता चार दिवसांपासून तीन शतकी मजल कोरोना गाठत आहे. १० फेब्रुवारीला ३५९, ११ फेब्रुवारीला ३१५, १२ फेब्रुवारीला ३६९ आणि शनिवारी ३७६ चा आकडा कोरोनाने गाठला. कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे आतापर्यंत २४ हजार ८९५ अशी कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या झाली आहे.

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या २८६ जणांना शनिवारी कोविड रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अशाप्रकारे कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या आता २३ हजार ३८० झाली आहे. दिवसभरात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ४३२ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीती व्यक्त होत असली तरी दैनंदिन व्यवहारासाठी आस्थापनांमध्ये पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसून येत आहे.

दरम्यान, नागरिकांच्या सुविधेसाठी सर्व आस्थापना, सुविधा सुरळीत सुरू राहतील. तथापि, कोविड प्रतिबंधासाठी बाजारपेठा, प्रार्थनास्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दीला प्रतिबंध करणारा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी जारी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी शनिवारी दिली.

------------

पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

संचारबंदीच्या तत्त्वानुसार पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रा, उत्सव, सभा, संमेलने बंद राहतील. लग्नसमारंभासाठी ५० हून अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकत नाहीत. प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी होऊ नये व सोशल डिटन्स पाळणे जाईल याची दक्षता घेण्याची सूचना धार्मिक संस्थांना देण्यात आली आहे.

-------------

दहावी-बारावीच्या शाळा वगळल्या

दहावी- बारावी वगळून शाळा, महाविद्यालये यांसह सर्व कोचिंग क्लासेस व शिकवण्याही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कारवाईचे निर्देश पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.