शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ३७ सुरक्षारक्षकांना कात्री

By admin | Updated: February 3, 2017 00:17 IST

अमृत’ संस्थेकडून महापालिकेला पुरविण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कात्री लावण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून ३७ सुरक्षारक्षकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.

आस्थापना खर्चात बचत : पुन्हा उजळणीअमरावती : ‘अमृत’ संस्थेकडून महापालिकेला पुरविण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना कात्री लावण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून ३७ सुरक्षारक्षकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. ज्याठिकाणी सुरक्षारक्षकांची आवश्यकता नाही, अशा ठिकाणचे सुरक्षारक्षक कमी करण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. भविष्यात आणखी सुरक्षारक्षक कमी करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांसह प्रशासकीय विभागात ‘अमृत’ याकंत्राटी एजन्सीकडून महापालिकेला सुरक्षारक्षक पुरविण्यात येत आहेत. मे २०१६ मध्ये ‘अमृत’ला १४६ सुरक्षारक्षक पुरविण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. वेळोवेळी मागणीनुसार सुरक्षारक्षक वाढविण्यात आलेत. आॅगस्ट २०१६ मध्ये सुरक्षारक्षकांची संख्या १७८ वर जाऊन पोहोचली. ‘लोकमत’ने यासंदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेतून ‘अमृत’ या संस्थेकडून होत असलेल्या अटी-शर्र्तींच्या उल्लंघनावर प्रकाशझोत टाकला. त्याचवेळी सुरक्षारक्षकांच्या संख्येची आवश्यकतेनुसार पडताळणी व्हावी, असा अभिप्राय अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी दिला. तत्पूर्वीच आयुक्त हेमंत पवार यांनी महापालिकेत कंत्राटी तत्वावर कार्यरत संपूर्ण कर्मचाऱ्यांचा ‘रिव्ह्यू’ घेतला. त्यात त्यांना अनेक ठिकाणी वाजवीपेक्षा अधिक आणि काही ठिकाणी गरज नसताना सुरक्षारक्षक आढळून आलेत. त्यानुसार आस्थापना खर्चात बचत करण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी विभागनिहाय आढावा घेतला व त्यानंतर ‘अमृत’च्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षारक्षकांच्या कपातीबाबत अवगत करण्यात आले. ३७ सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केल्याने महापालिकेची महिन्याकाठी ३ लाख २२ हजार रूपयांपर्यंत आर्थिक बचत होणार आहे. ३७ सुरक्षारक्षक १ फेबु्रवारीला कमी करण्यात आलेत. यानंतरही ही कपात केली जाणार आहे. अगदी आवश्यक असलेल्या ठिकाणीच सुरक्षारक्षक कार्यरत राहतील. कामावरुन कमी करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांबाबत ‘अमृत’ कडूनही संबंधित विभागप्रमुखांना कळविण्यात आले आहे.