अमरावती : जिल्ह्यात मात्र लसींचा पुरवठाच विस्कळीत असल्याने अर्धेअधिक केंद्र बंद राहत आहेत. त्त्यामुळे तब्बल ३,६७,६८९ नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत फक्त ६.८२ टक्के नागरिकांनीच लसींचे दोन्ही डोस घेतले. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. या सहा महिन्यात ७,७७,०२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ५,७२,३५५ नागरिकांनी पहिला व २,०४,६६६ नागरिकांनी दुसरा डोज घेतला. या कालावधीत ७,५५,५८० डोस जिल्ह्यास प्राप्त झालेत. यामध्ये ५,९२,३३० कोविशिल्ड व १,६३,२५० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. कोविशिल्डचा सर्वाधिक पुरवठा होत असल्याने आतापर्यंत ६,२०,८१२ नागरिकांनी कोविशिल्ड व १,५६,२०९ नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतलेली आहे.
पाईंटर
दुसरा डोज बाकी
फ्रंटलाईन वर्कर : ६,१०७
हेल्थ केअर वर्कर : २७,०२५
१८ ते ४४ वयोगट :१,२६,००५
४५ तर ५९ वयोगट : १,१७,१३६
६० वर्षांवरील : ९१,०८८
बॉक्स
अनेकांचा विहित कालावधी संपला
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोज हा ८४ दिवसांनंतर घ्यावा लागतो. मात्र, अनेक नागरिकांचे १०० होऊनसुद्धा त्यांना लस मिळालेली नाही. या नागरिकांना पहाटेपासून रांगा लावल्या. यामध्ये काहींना डोस मिळाले, तर काहींना माघारी परतावे लागले आहे. पैसे मोजण्याची तयारी असताना खासगी रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने ही स्थिती ओढवली आहे.
बॉक्स
लसीकरणाची घटकनिहाय स्थिती
जिल्ह्यात सद्यस्थितीत ७,७७,०२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर ३५,७८७, फ्रंट लाईन वर्कर ५७,१८३, १८ ते ४४ वयोगट १,५३,६६७, ४५ ते ५९ वयोगट २,६३,८८२ व ६० वर्षावरील २,६६,५१२ नागरिकांचा समावेश आहे. लसीकरण केंद्र नेहमीच बंद राहत असल्याने यापैकी ७० टक्के नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे.
कोट
सर्व गटांमध्ये दुसरा डोसला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी