शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

३५० शिक्षक बदली आदेशासाठी रस्त्यावर

By admin | Updated: September 27, 2016 00:14 IST

मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत १५ वर्षे सेवा बजावणाऱ्या ३५० शिक्षकांच्या जिल्हा परिषद प्रशासनाने...

बेमुदत उपोषण : जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचा डेराअमरावती : मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत १५ वर्षे सेवा बजावणाऱ्या ३५० शिक्षकांच्या जिल्हा परिषद प्रशासनाने मागील जून महिन्यात बदल्या केल्यात. मात्र या शिक्षकांना अद्यापही कार्यमुक्त करण्यात न आल्याने याविरोधात मेळघाट कृती समितीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.जि.प. प्रशासनाने न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून सन २०१५-१६ मध्ये बदली प्रक्रिया राबवून विषय शिक्षकांच्या नेमणुकी अतिरिक्त शिक्षकांचे तालुका व जिल्हास्तरावर समायोजन तसेच मेळघाटात १३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या २०८ शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या केल्या होत्या. या बदल्या झाल्यानंतर प्रशासकीय बदलीमध्ये एकास एक या प्रमाणात बदली होऊन सपाटीवरील शिक्षकांनी शासनाची दिशाभूल करून झालेली प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका दाखल झाल्यामुळे खोळंबून पडली होती. याबाबत न्यायालयाने शासनाच्या बाजूने नुकताच निकाल दिला आहे. त्यामुळे जूनमध्ये करण्यात आलेली बदली प्रक्रिया ही न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना आदेश देता आले नाही. परंतु आता ६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाने विषय शिक्षक, अतिरिक्त शिक्षक तसेच मेळघाटातून प्रशासकीय बदल्या झालेल्या शिक्षकांना आदेश देणे आवश्यक होते. याबाबत मेळघाट कृती समितीने सीईओ किरण कुलकर्णी यांची दोनदा भेट घेऊन झालेल्या बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश निवेदनात दिले. दरम्यान २६ सप्टेंबरपर्यंत बदली आदेश देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी केली आहे. उपोषणात मेळघाट कृती समितीचे मनिष काळे, सूरज वाघमारे, विकास भडांगे, अनिल वानखडे, दिलीप जावरकर, प्रियदर्शी मेंढे, इमरान खान, राऊब खान, वंदना धवणे, लिला साळुंके, संगीता उंबरकर, प्रवीण ढोके, भूषण बागड, प्रशांत पवार,उमेश आडे, शिक्षकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)