शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जिल्ह्यात ३४ हजार ८५१ अंगठेबहाद्दर

By जितेंद्र दखने | Updated: March 14, 2024 00:19 IST

जिल्हाभरात सर्वेक्षण : २०२७ सालापर्यंत  करणार साक्षर

अमरावती : पश्चिम विदर्भातील एज्युकेशन हब असलेल्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात ३४ हजार ८५१ जण निरक्षर असल्याचे समोर आले आहे. २०२७ सालापर्यंत टप्प्याटप्याने या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबविणार आहे.

सर्वांना साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून नवभारत साक्षरता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण, स्वयंसेवक आणि निरक्षरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांकडून उल्हास पोर्टलवर निरक्षरांची संख्या नोंदवण्यात आली. प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक असे दोन हजार स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुण स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. पहिल्यांदा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाईल. महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास त्या निरक्षरांना जिल्हा परिषदांच्या शाळेतदेखील स्वयंसेवक शिक्षणाचे धडे देत आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावरही त्यांना मोफत अध्यापन केले जाईल. मोबाइलवरही शिक्षणनिरक्षरांमधील अनेकांना अक्षरओळख नाही, पण अँड्रॉइड मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाइलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. तालुकानिहाय निरक्षरजिल्ह्यात अचलपूर २३५१, अंजनगाव सुर्जी २७७२, तिवसा २२४१, मोर्शी २३५०, वरूड ३१५०, अमरावती ग्रामीण २२४८, नांदगाव खंडेश्वर १५४९, चांदूर बाजार २६२२, धामणगाव रेल्वे ३३९३, दर्यापूर २२७९, धारणी ३९६३, भातकुली ६७४, चिखलदरा १८०४, महापालिका क्षेत्र १००४, चांदूर रेल्वे २४५१ याप्रमाणे सर्वेक्षणात निरक्षर आढळले आहेत. शिक्षणाधिकारी योजना कार्यालयामार्फत या निरक्षरांची नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पहिली परीक्षा लवकरच त्या-त्या तालुक्यातील महसुली गावातील शाळेत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.- प्रीतम गणगणे, सहायक योजना अधिकारी निरक्षरतेची कारणे...कुटुंबातील गरिबी, रोजगारासाठी स्थलांतर, पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष, शैक्षणिक वातावरणाचा अभाव, शाळा जवळ नसणे आदी.

टॅग्स :Amravatiअमरावती