शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

भानखेडा परिसरातील ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्मवरील  कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून यानंतर तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व १० किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये ३३,५०० कोंबड्या रविवारी खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.

ठळक मुद्देबर्ड फ्लू प्रतिबंधक कारवाई, १० किमी परीघ सर्वेक्षण क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया रविवारी पूर्ण करण्यात आली.  नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी ९० रुपये प्रतिपक्षी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्मवरील  कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून यानंतर तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व १० किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये ३३,५०० कोंबड्या रविवारी खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शीघ्र कृती दलांना सूचना दिल्या. बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलावू नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. पोल्ट्रीधारकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश   दिले. उपविभागीय अधिकारी राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, सहायक आयुक्त कावरे, अवघड, पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुट पक्ष्यांना नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. या कामासाठी दीडशे पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ३२ पथके तैनात करण्यात आली होती. यात सतीश गोळे यांच्या पोल्ट्री फार्ममधील २९ हजार कोंबड्या व   मेश्राम यांच्या ४ हजार ५०० कोंबड्या नष्ट करण्यात आल्याचे गोहोत्रे यांनी सांगितले.पोल्ट्री फार्म संचालकांना सानुग्रह अनुदानपोल्ट्री फार्ममधील एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा तयार करण्यात आला. त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामग्री टाकून पक्ष्यांना टाकले व  सदर खड्डा बुजविण्यात आला. एक किलोमीटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा ९० दिवसांसाठी सीलबंद राहील. नष्ट केलेल्या कोंबड्यांचे ७० रुपये प्रतिपक्षी व खाद्यघटक २० रुपये प्रतिपक्षी असे ९० रुपये प्रतिपक्षी दराने सानुग्रह संबंधित पोल्ट्री मालकांना नुकसानभरपाई शासनाकडून देण्यात येणार असल्याचे डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू