शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

३३४ कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांत बदल्या

By admin | Updated: May 16, 2017 00:11 IST

जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे.

झेडपीत हंगामा : कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत मागील काही दिवसांपासून वर्ग तीन आणि चार मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मागील तीन दिवसात विविध विभागातील ३३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रशासनाने केल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षक १४ अशा एकूण १५, कृषी विभागामधील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी अशा प्रत्येकी १ याप्रमाणे २ बदल्या करण्यात आल्या आहेत.वित्त विभागात सहायक लेखाअधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी अशा १० बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन मधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंता प्रत्येकी २ अशा चार, बांधकाममधील कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियंत्यांच्या १३, महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका १५,पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता १, पंचायत मधील विस्तार अधिकारी पंचायत७, ग्रामविकास अधिकारी ७ व ग्रामसेवक ४१ अशा ५५ बदल्या केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी ३, विस्तार अधिकारी सांख्यिकी ३, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ६, कनिष्ठ सहायक १२, परिचर २९ अशा १०५, आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक ६, औषध निर्माण अधिकारी ११, आरोग्य सहायक महिला ९, आरोग्य सेवक महिला ४९, आरोग्यसेवक पुरूष २८ अशा ११४ बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी श्रेणी दोन व तीनमधील प्रत्येकी एक अशा दोन बदल्या करण्यात आल्या आहेत. यासर्व बदल्यांमध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने तीन दिवसात एकूण ३३४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांन मध्ये कही खुशी कही गमचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले आहेत.मेळघाटात सेवा दिल्यासच आपसी बदली ?सध्या बदली प्रक्रिया सुरू आहे. मात्र आपसी बदली मागणाऱ्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक व अन्य संवर्गातील काही कर्मचाऱ्यांनी आपसी बदल्यासाठी प्रशासनाकडे रीतसर अर्ज केलेत. त्यानुसार सोमवारी आपसी बदली प्रक्रिये दरम्यान आपसी बदली मागणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी मेळघाटात सेवा दिली असेल तरच बदलीचा नवा फंडा प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे आपसी बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी सीईओकडे धाव घेऊन न्याय मागितला. परंतु प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असा कुठलाही शासन नियम नसल्याचा दावा आपसी बदल्या मागणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.