शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

३३ लाख हेक्टर पेरणीक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:13 IST

यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ७६ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे.

खरीप हंगाम : गतवर्षीच्या तुलनेत ८२ हजार हेक्टर क्षेत्रवाढलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३२ लाख ७६ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८२ हजार हेक्टर पेरणी क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. यामध्ये कपाशीची क्षेत्रवाढ होणार आहे. तूर व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी चार लाख पाच हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्राकडून दोन लाख ६१ हजार क्विंटल व खासगी कंपनीकडून एक लाख ४४ हजार क्विंटल अशी मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये महाबीज मार्फत दोन लाख ३२ हजार क्विंटल खासगी कंपनीकडून २९ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.नऊ लाख चार हजार हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीसाठी नियोजित आहे. गतवर्षी आठ लक्ष ६१ हजार २४० हेक्टर पेरणी क्षेत्र होते. त्यातुलनेत ४२ हजार ७६५ हेक्टरने वाढ होणार आहे. यासाठी ४६ लाख ४५ हजार बियाण्यांची पाकिटे लागणार आहेत. ही मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात ३० लाख, दुसऱ्या टप्प्यात १६ लाख ४५ हजार, याप्रमाणे उपलब्ध होणार आहे. खरीप ज्वार, मका, तूर, मूग व उडीद या पिकासाठी एक लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. मागणीनुसार ९ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होणार आहे.यंदाच्या हंगामासाठी सहा लाख ६९ हजार मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता आहे. यापैकी पाच लाख ७९ हजार मे. टन रासायनिक खतांचे आवंटन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे मार्च २०१७ अखेर एक लाख ११ हजार मे.टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. मागील तीन वर्षांत चार लाख ८३ हजार मेट्रिक टन खतांचा वापर झाला होता. मागील वर्षी चार लाख ५२ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर करण्यात आला होता, हे येथे उल्लेखनीय. २५ मे ते ८ जूनदरम्यान उन्नत शेती पंधरवडाशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘उन्नत शेती-समृद्ध शेती’ पंधरवडा २५ ते ८ जूनदरम्यान कृषी विभागाद्वारा साजरा करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीपासून शेतीचे संरक्षण करणे, पिकांचे उत्पादन खर्च कमी करणे, शेतमाल विक्रीचे तंत्र, शेतीपूरक व्यवसायांना चालना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी शेतकऱ्यांना अवगत केले जाणार आहे.