शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रस्त्यांसाठी 33 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:01 IST

जिल्ह्यातील रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाकडून अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची पुढील प्रक्रिया सुरळीत होऊन ही कामे गती घेणार आहेत.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात तरतूद, विकास गतिमान होणार : पालकमंत्र्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती बांधकाम आदी पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडून ३३ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात  करण्यात आली आहे.  त्यामुळे अनेक रस्ते व पुलांची कामे मार्गी लागून विकास गतिमान होणार असल्याचे  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सांगितले.जिल्ह्यातील रस्त्यांच्या आवश्यक सुधारणा, पूल आदी अपेक्षित कामांबाबत पालकमंत्र्यांनी स्वत: ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली होती व ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाकडून अर्थसंकल्पात या रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची पुढील प्रक्रिया सुरळीत होऊन ही कामे गती घेणार आहेत.खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेची कामे याद्वारे होणार आहेत. रस्त्यांवरील आवश्यक पुलांचेही काम सुरू होणार आहे. यामुळे प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण होणार आहे. अनेक तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सुविधा निर्माण होईल. राज्याच्या गतिमान विकासासाठी   शासन कटिबद्ध असल्याची  ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

असा मिळाला निधीराज्य महामार्ग ३०३ बेलोरा काटसूर आडगाव रस्ता  १.२० कोटी, पूर्णानगर निरूळ गंगामाई वाकी खोलापूर रस्ता सुधारणा व पुलासाठी ३ कोटी, अडगाव यावली पिंपळविहीर मार्डी कार्ला ते चांदूर रेल्वे रस्ता सुधारणेसाठी १.५ कोटी, अडगाव यावली मार्गे माउली जहाँगीर रस्त्यासाठी ९० लाख, यावली-डवरगाव, मोझरी वऱ्हा रस्ता ४.५ कोटी, मार्डी-कारला- चांदूर रेल्वे मार्गासाठी ४ कोटी, तळवेल साऊर, तरारखेडा, आष्टी, वायगाव खारतळेगाव रस्त्यासाठी १.५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

या रस्त्यांचीही सुधारणाविर्शी, वायगाव रस्ता सुधारणा व छोट्या पुलासाठी २ कोटी, रिद्धपूर-बेलोरा- चिंचोली काळे–देवरी- कठोरा-नांदगावपेठ रस्ता सुधारणा व पुलासाठी ४ कोटी, तरारखेडा, पुसदा, रोहणखेडा, माउली जहाँगीर रस्ता सुधारणा व पुलासाठी ३, कोटी, उदखेड, खोपडा, शिरखेड रस्ता सुधारणेसाठी ३.७० कोटी, बहिरम, सरफापूर फाटा चांदूर बाजार, बेलोरा, यावली, चांदूर रेल्वे रस्ता सुधारणा व पुलासाठी १.७१ कोटी, नेरपिंगळाई, आखतवाडा वाठोडा, रस्ता सुधारणा व पुलासाठी १.९० कोटींची तरतूद  आहे.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर