शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

५८ हजार शेतकऱ्यांना ३२६ कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:31 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५१ लाख ९८ हजारांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्देबँकांकडे वर्ग : जिल्हा बँकेकडे ३२,४०० शेतकऱ्यांची यादी पडताळणीला

आॅनलाईन लोकमतअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५१ लाख ९८ हजारांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. या आठवड्यात पुन्हा जिल्हा बँकेकडे ३२,४०० शेतकऱ्यांच्या याद्या पडताळणीसाठी पाठविल्या आहेत. प्रोत्साहनपर लाभ मिळणाऱ्या १३ हजार लाभार्थ्यांच्या याद्या तूर्त माघारल्या आहेत.दोन महिन्यांपासून तात्पुरत्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पडताळणीची प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. सहकार विभाग व बँकेच्या पडताळणीअंती याद्या आयटी विभागाला पाठविण्यात येत आहे. नव्या सॉफ्टवेअरनुसार एक लाख चार हजार शेतकºयांच्या याद्या पडताळणीनंतर अपलोड करण्यात आल्यात. गेल्या दोन महिन्यांपासून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या याद्या अपडेशनचे काम सहकार विभाग व जिल्हा बँकेद्वारा युद्धस्तरावर सुरू आहे. यामध्ये शासन निकषानुसार पहिल्या टप्प्यात बँकांचे थकबाकीदार शेतकऱ्यांमधून निकषपात्र लाभार्थी, दुसऱ्या टप्प्यात पडताळणी करून निकषपात्र लाभार्थ्यांची यादी अपलोड करणे, तिसऱ्या टप्प्यात सहकारी संस्थांसह इतर पदाधिकारी वगळून त्यांची नावे अपात्रतेच्या यादीत समाविष्ट करणे आदी प्रक्रिया आतापर्यंत सुरू होती. एकूण ७४९ संस्थांच्या पात्र एक लाख चार हजार २१८ लाभार्थ्यांच्या याद्या आयटी विभागाकडे अपलोड केल्यात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या त्या-त्या शाखांच्या मुख्य कार्यालयाद्वारा अपलोड करण्यात आल्याची एकीकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.अशी आहे बँकानिहाय रक्कम वर्गजिल्हा बँकेत २६,०८६ शेतकऱ्यांना१०९.९२ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. बँक आॅफ बडोदाच्या १०९ खातेदारांना ५०.८९ लाख, बँक आॅफ इंडियाच्या १४३४ खातेदारांना १२.५१ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्रच्या ५७११ खातेदारांना ३५.२९ कोटी, कॅनरा बँकेच्या १२२ खातेदारांना ७६.३९ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया २६६० खातेदारांच्या १७.९८ कोटी, देणा बँकेच्या ३९ खातेदारांना ३५.७ लाख, इंडियन बँकेच्या ३०९ खातेदारांना२.५६ कोटी, एसबीआयच्या २०,२२६ खातेदारांना १३४.३८ कोटी, युको बँकेच्या १३ खातेदारांना ५ लाख, युनियन बँकेच्या १२१५ खातेदारांना ८.१३ कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली.कर्जमाफी वर्ग लाभार्थींची यादी पोर्टलवरशासनाने कर्जमाफी दिलेल्या शेतकरी लाभार्थ्यांची यादी आता आयटी विभागाद्वारा ‘आपले सरकार’ पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. यासाठी याद्यांची पडताळणी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. त्या शेतकऱ्यांची नावे नागरिकांच्या माहितीसाठी पोर्टलवर राहणार आहे. या विषयीच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.