धोक्याची घंटा : प्रकल्पक्षेत्रात कमी पाऊस झाल्याचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जून महिना कोरडा गेल्यामुळे जिल्ह्यातील ७७ लघुप्रकल्पापैकी ३२ लघुप्रकल्पात केवळ मृत साठाच शिल्लक आहे. जून महिना कोरडा गेल्यामुळे हे सर्व लघुप्रकल्प तहानलेले आहेत. यामध्ये सरासरी १०. ३३ टक्केच पाणीसाठा आहे. चार मध्यम प्रकल्पात ३६ टक्के तर उर्ध्व वर्धा प्रकल्पात ३४ टक्के साठा शिल्लक आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्याने जलस्तर झपाट्याने कमी होत आहे.जिल्ह्यातील एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात संकल्पीत ५६४.०५ टिएमसी साठ्याच्या तुलनेत १९५.२७ टिएमसी साठा शिल्लक आहे. तर मध्यम प्रकल्पामध्ये शहानूर प्रकल्पात संकल्पीत ४६.०४ टिएमसीच्या तुलनेत सद्यस्थितीत १८.८१ टिएमसी, चंद्रभागा प्रकल्पात संकल्पीत ४१.२५ टिएमसीच्या तुलनेत १७.९६ टिएमसी, पूर्णा प्रकल्पात संकल्पीत ३५.३७ टिएमसी साठ्याच्या तुलनेत ६.८५ व सपन प्रकल्पात संकल्पीत ३८.६० टिएमसी साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३८.६० टिएमसी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात एकूण ७७ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये संकल्पीत १७९.८३ टिएमसी साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत २६.६७ टिएमसी साठा शिल्लक आहे. ही १३.८२ टक्केवारी आहे.या लघु प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षाजिल्ह्यातील पिंपळगाव, सूर्यगंगा, खतिजापूर, गोंडवाघोली, गोंडविहिर, सावरपाणी, जळका, दाभेरी, त्रिवेणी, शेकदरी, सातनूर, जामनेर, बेलसावंगी जमालपूर, गावलानडोह, सावलीखेडा, मांडवा, रभांग, बोबदो, लडादा, सारई, बेरदा, गंभेरी, ज्युटपाणी, मोगर्दा लघुप्रकल्पात केवळ मृतसाठाच असल्याने पाऊस लांबल्यास धोक्याची घंटा आहे.
३२ लघुप्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक
By admin | Updated: July 6, 2017 00:20 IST