शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयात ३२ लाखांचा अपहार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:45 IST

नाशिकच्या अखत्यारितील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय धारणी येथील कार्यालयात सुमारे ३२ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड झाला आहे.

धारणी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिकच्या अखत्यारितील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय धारणी येथील कार्यालयात सुमारे ३२ लाख रुपयांचा आर्थिक अपहार उघड झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी धारणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.मेळघाटातील आदिवासी बांधवांना राज्य शासनाकडून मोफत गॅस युनिट संच वाटप करण्याकरिता आले होते. त्यापैकी निवडक आदिवासी लाभार्थ्यांना लाभ देऊन उर्वरित लाभार्थ्यांना वाटप न करता तत्कालीन तीन प्रादेशिक व्यवस्थापक  व वीजतंत्री असलेल्या एका कर्मचाºयाने त्यात ३१ लाख ८१ हजार १६० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सध्या विद्यमान प्रादेशिक व्यवस्थापक यांनी गुरुवारी धारणी पोलिसांत केली आहे.राज्य शासनाकडून सन २००४ ते २००९ पर्यंतच्या कालावधीत मेळघाटातील आदिवासी बांधवांना मोफत गॅस युनिट संच वाटपाची योजना राबविण्यात आली. या योजनेत ६३ हजार २ लाभार्थ्यांना गॅस युनिट संच मंजूर झाले होते. सन २०१२-१३ या कालावधीत गायकवाड समितीने चौकशी केली असता ११८७ गॅस यूनिट संच वाटप न केल्याचे निष्पन झाले. तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक श्याम नारायण मून, नामदेव मेश्राम, डी.आर. वाघमारे, वीजतंत्री चंद्रकांत भलावी या चौघांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला. त्याबाबत ७ नोव्हेंबर रोजी  प्रादेशिक  व्यवस्थापक गजानन कोटलवार यांनी धारणी पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीअंती चौघांविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.