शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

३०० गावे एसटीविना!

By admin | Updated: January 4, 2015 23:04 IST

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

ग्रामस्थांच्या नशिबी पायपीटच : विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशांचे प्रचंड हाल अमरावती : महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे. बॉम्बे परिवहन महामंडळाचे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रूपांतर झाले. तेव्हापासून गाव पातळीपर्यंत एसटी बस पोहोचवण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. ज्या ठिकाणी रेल्वे सेवा पोहोचू शकत नाही. त्या गावातील नागरिकांना प्रवासासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने गाव फाट्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असतात. ५० वर्षांच्या खडतर प्रवासात गाव तेथे एसटी या ब्रिदवाक्याचे तीनतेरा वाजले. तालुक्यांमध्ये १९८१ गावे आहेत. यातील जवळपास २०० गावे अद्याप सार्वजनिक दळणवळणा पासून दूर आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची कसरतथेट गावात एसटी पोहोचत नसल्याने आबालवृद्धांना दोन ते तीन किलोमिटरची पायपीट करत फाटा गाठावा लागतो. याचा फटका भावी पिढीला बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही किमी अंतर पायी जाऊन शाळा गाठावी लागते. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात एसटीची सेवा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली आहेत.जीव धोक्यात घालून प्रवास गावात एसटीची सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा उपयोग करावा लागतो. खासगी प्रवासी वाहतूकदारांमध्ये स्पर्धा होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. परिणामी ग्रामस्थांना धोक्याचा सामना करावा लागतो. बस न पाठविण्याची कारणेजिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत जेथे फाट्यापासून गावाचे अंतर जवळ आहे. नदी किंवा नाले आडवे येतात. तसेच त्या गावांतील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. काही गावांमधून एसटीला जास्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे अशा ठिकाणची सेवा बंद करण्यात आलेली आहे.