शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

मेळघाटात सहा महिन्यांत ३०० चिमुकल्यांचा कुपोषणाने मृत्यू

By admin | Updated: November 29, 2014 00:21 IST

सहा महिन्यांत मेळघाटात ३०० आदिवासी चिमुकल्यांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. ३ हजार बालके मरणासन्न अवस्थेत आहेत.

राजेश मालवीय धारणीसहा महिन्यांत मेळघाटात ३०० आदिवासी चिमुकल्यांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. ३ हजार बालके मरणासन्न अवस्थेत आहेत. १४ हजार बालके गंभीर कुपोषणाच्या विळख्यात अडकले आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मेळघाटात एकूण ५१ हजार आदिवासी बालके कुपोषण श्रेणीत आहेत. त्यात ३४ हजार साधारण श्रेणीत, १४ हजार मध्यम श्रेणी आणि ३ हजार तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत. कुपोषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य वैद्यकीय यंत्रणा, औषध साठा, २२ भरारी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पथके, ग्राम बालविकास केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, बाल उपचार केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी, सामाजिक संस्था, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आदीच्या माध्यमातून आवश्यक ती सोईसुविधा पुरविल्या जात आहे व कुपोषणावर दर महिन्यात २ कोटी रूपयांपेक्षाही अधिक शासन खर्च करीत आहे. एकट्या जि.प.च्या बालविकास प्रकल्प कार्यालयातून कुपोषितांच्या अतिरिक्त आहार व पूरक पोषण आहारावर दर महिन्यात ५० लाख रूपये खर्च होत असल्याची नोंद आहे. तरीही कुपोषण नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.