भरघोस प्रतिसाद : वृक्ष लागवडीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव अमरावती : पर्यावरण राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड अभियानात कर्मचारी, अधिकाऱ्यांना व जनतेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. वृक्षरोपण करून लावलेल्या झाडांसोबत स्वत:चा फोटो काढून पाठविण्याचे आवाहनही शासनामार्फत करण्यात आले होते. या उपक्रमाला कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी व जनतेनी भरघोस पाठिंबा दर्शविला आहे. तब्बल ३ लाख २३ हजार सेल्फि विथ ट्रीचे फोटो पर्यावरण राज्यमंत्र्यांना त्यांच्या ८३७८०८९००० या व्हॉट्स अॅप क्रमांकावर मिळाले आहे.ना. पोट यांच्याकडे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म व उद्योग अशी महत्त्वाची खाती असून त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक विकास मडंळासारखा महत्त्वाचा विभाग आहे. वन खात्याबरोबरच पर्यावरण टिकविण्याची जबाबदारी पर्यावरण खात्यावर आहे. पर्यावरण राज्यमंत्री म्हणून २ कोटी वृक्ष लागवडीत ना. प्रवीण पोटे यांनी प्रथमपासूनच अतिशय हिरीरीने सहभाग घेऊन त्यांच्या अधिनस्त असलेल्या खात्यातील व महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्याने, अधिकाऱ्याने व जनतेंनी व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या गैरशासकीय संस्थांनी लावलेल्या वृक्षासोबत फोटो (सेल्फी विथ ट्री) पाठविण्याचे आवाहन त्यांनी मुबंई येथे पार पडलेल्या पर्यावरण परिषदेत पत्रकाद्वारे केले होते. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत ८३७८०८९००० हा क्रमांक देऊन नागरिकांनी व कर्मचाऱ्यांना सेल्फी विथ ट्री पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम संबध महाराष्ट्रातून ३ लाख २३ हजार जणांनी सेल्फी विथ ट्री पाठविले आहेत. अजूनही सेल्फी विथ ट्री मिळत आहेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार ना.पोटे करणार आहेत.
पालकमंत्र्यांच्या ‘व्हॉट्स अॅप’वर ३ लाख ‘सेल्फी विथ ट्री’
By admin | Updated: July 4, 2016 00:09 IST