शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या मराठी पेपरला ३ कॉपी बहाद्दर पकडले!

By जितेंद्र दखने | Updated: February 24, 2024 19:03 IST

भरारी पथकांची कारवाई :  परीक्षार्थ्याच्या तपासणीत प्रकार उघड

अमरावती : इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी मराठी विषयाच्या पेपरला विद्यार्थी कॉपी करताना ३ विद्यार्थ्याना पकडल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सुत्रांनी दिली. त्यात अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात करजगाव येथील परीक्षा केंद्रावर दोन तर बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यात एक अशा ३ कॉपी बहाद्दरांना भरारी पथकाने पकडले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ३६ हजार ७० परीक्षार्थी आहेत. बारावीसाठी कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम व इतर विषय आहेत. 

२१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून आतापर्यत ३ विषयांचे पेपर संपले आहेत. दरम्यान, यंदा कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी महसूल, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जात आहे. परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ,शिक्षण उपसंचालक यांच्यासह शिक्षणाधिकारी,प्राथमिक,माध्यमिक विभाग व प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र भरारी पथक, बैठे पथकाचे असे नियोजन केले आहे. ही भरारी पथके विविध केंद्रांना भेटी देत आहेत.  अशातच बारावीच्या परीक्षेत  शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या मराठीच्या पेपरला भरारी पथकांने विविध केंद्रांना दिलेल्या भेटीदरम्यान तपासणीत पेपर साेडवितांना तिन विद्यार्थ्यी कॉपी करतांना आढळून आले.  बॉक़्स

उपाययोजनेतंतर आढळले कॉपी बहाद्दरबारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकरणे घडू नये अशा अनुषंगाने विभागीय शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहे.याशिवाय ९ भरारी पथके गठीत केलेली आहेत. विशेष म्हणजे यंदा पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नो एन्ट्री आहे.सोबतच परीक्षार्थीना चप्पल-बूट बाहेरच काढावे लागत असतांना कॉपी करतांना विभागात परीक्षेच्या तिसऱ्या दिवशी तीन प्रकरणे उघड झाली.

टॅग्स :Amravatiअमरावती