शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती राज्यात दुसरी, शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत मिळवले उत्तुंग यश

By प्रदीप भाकरे | Updated: April 20, 2023 18:01 IST

‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये अमरावती महापालिकेने १० कोटी रुपयांचे द्वितिय बक्षिस पटकावले.

अमरावती : शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ चा निकाल नगरविकास दिनी गुरूवारी घोषित करण्यात आला. ‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल, अमरावती व अहमदनगर महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये अमरावती महापालिकेने १० कोटी रुपयांचे द्वितिय बक्षिस पटकावले.

स्पर्धेसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची सहा गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी रुपये या प्रमाणे पारितोषिके देण्यात आले. नगरविकास दिनानिमित्त गुरूवारी मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आला. अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो दहा कोटींचा पुरस्कार स्विकारला. राज्यातील शहरे स्वच्छ व सुंदर दिसावी या संकल्पनेतून शासनाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये एक शासन निर्णय पारित केला होता. त्याअंतर्गत राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ राबविण्यात आली होती. अमरावती महानगरपालिकेनेही या स्पर्धेत सहभाग घेत महापालिका हद्दीत कायापालट अभियान राबविले. पालिकेने राबविलेल्या उपक्रमांमुळे पालिका प्रशासनाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. यावेळी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी देखील उपस्थित होत्या.

असे बदलले रूपडे

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीत पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. महापालिकेने शहरातील रस्ते सौंदर्यीकरण केले. शहरातील विविध शाळा, सरकारी कार्यालये, निवास स्थाने, उड्डाणपूल, खासगी मिळकतींच्या वाडे भिंतींवर विद्यार्थ्यांमार्फत सुंदर चित्रे रंगवून या भिंतीचे रुपडे नेत्रसुखद केले. या कामांची पोचपावती म्हणून शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये शासनाच्या समितीने ‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये शहराला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार. या सर्वांच्या एकत्रित कामामुळे, टीम वर्कमुळे आपण राज्यात दुसरा क्रमांक पटकावू शकलो. शहर अभियंता व त्यांची इंजिनियर टीम, सहाय्यक आयुक्तांचे सांघिक प्रयत्नांमुळे अंबानगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त, अमरावती