शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 20:45 IST

एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे.

- संदीप मानकर

अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे नऊ प्रकल्प, मध्यम २४ व लघु ४७६ प्रकल्प असे एकूण ५०९ प्रकल्पांत केवळ २९.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उन्हाळ्याच्या दीड महिन्यापर्यंत ते पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनी सांगितले. मोठ्या नऊ प्रकल्पांमध्ये सरासरी ४६.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अनेक जिल्ह्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याची सर्वाधिक झळ बुलडाणा जिल्ह्याला पोहचली होती.

एकूण ५०९ प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ९४९.८३ दलघमी एवढा आहे. त्याची टक्केवारी २९.४९ एवढी आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीत ५३.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात ३७.२७ टक्के, अरुणावती १३.४४ टक्के, बेंबळा प्रकल्पात ५९.६९ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प ४८.१५ टक्के, वान ५१.१५ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प ५३.५८ टक्के, पेनटाकळी ५१.०१ टक्के, खडकपुर्णा ३४.२१ टक्के पाणीसाठा आहे. यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती चांगली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने २३ एप्रिलपर्यंतच्या अहवालात दिली.

२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यतील शहानूर या मध्यम प्रकल्पांत ६२ टक्के, तर चंद्रभागा प्रकल्पात ६४.७८ टक्के, पूर्णा ६४.४९ टक्के, सपन ६३.८९ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस ६२.४७ टक्के, सायखेडा ५२.२४ टक्के, गोकी २१.७५ टक्के, वाघाडी ३६.५७टक्के, बोरगाव २६.१७ टक्के, नवरगाव ४४.६३ टक्के, अकोला जिल्ह्याती निर्गुणा २४.५१ टक्के, मोर्णा ४५.७८ टक्के, उमा १४.७३ टक्के, घुंगशी बॅरेज ५२ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ४२.४५ टक्के, सोनल २७.९६ टक्के, एकबुर्जी ३६.३४ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा ६३.१९ टक्के, पलढग १०.७९ टक्के, मस ४१.१६ टक्के, कोराडी ६४.७५ टक्के, मन ५१.१५ टक्के, तोरणा २०.२८ टक्के, उतावळी ४२.९ टक्के  पाणीसाठा शिल्लक आहे.