शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजारांवर चाचण्या निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:55 IST

जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरसह, अकोला व सेवाग्राम येथील केंद्रांवर परिक्षण व्हायला लागले.

ठळक मुद्देनमुने तपासण्याची गती वाढली : जिल्ह्यात आठ केंद्रांवरून थ्रोट स्वॅब परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील असिम्टोमॅटिक व हायरिस्कचे रुग्ण त्वरेने निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार व्हावा व यामुळे संसर्ग टळून कोरोनाची साखळी बे्रक व्हावी, यासाठी जिल्ह्यात सात ठिकाणी असलेल्या स्वॅब तपासणी केंद्रावर आतापर्यंत ३३ हजार २०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २८ हजार ८२९ नमुने निगेटिव्ह आलेले आहे. हे प्रमाण ८७ टक्के असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात एप्रिल रोजी हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. मात्र, त्याचे दोन आठवड्यापासून संशयितांचे नमुने चाचणी नागपूर येथील शासकीय विषाणू परिक्षण प्रयोगशाळेत झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्याने येथील अहवालांचे नागपूरसह, अकोला व सेवाग्राम येथील केंद्रांवर परिक्षण व्हायला लागले. मात्र, मे महिन्यापासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची विषाणू परिक्षण प्रयोगशाळा सुरु झाल्याने अमरावती जिल्ह्यातील विषाणू संसर्गासंदर्भातील सर्व चाचण्या येथील लॅबद्वारेच होत आहेत.जिल्ह्यात आतापर्यत ४४ हजार ९०५ नागरिकांची तपासणी जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर रुग्णालयात करण्यात आली. यामध्ये ३३ हजार २०८ चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी केवळ २८ हजार ८२९ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह तर ३७६६ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. यामध्ये ९५ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत १०९६ रुग्णांवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. २१ रुग्ण नागपूर येथे उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली.अडीच हजार नागरिक कोरोनामुक्तजिल्ह्यात आतापर्यंत २५८३ नागरिक संक्रमणमुक्त झाल्याची सुखद वार्ता आहे. हे प्रमाण ७० टक्के आहे. केंद्र व राज्य शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार संक्रमित रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये असिम्टोमॅटीक व सौम्य स्वरुपाच्या रुग्णांवर पाच दिवस औषधोपचार व पाच दिवस निरीक्षणात ठेवल्यानंतर रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्यास त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येते. मात्र, या रुग्णांना सात दिवस गृह विलगीकरणात राहावे लागत असल्याची माहिती आहे.‘सिरो’ सर्व्हेक्षणाचे नियोजन केव्हा?जिल्ह्यातील किती नागरिकांचय शरिरामध्ये अ‍ॅन्टीबॉडीज विकसीत झाल्यात यासाठी रॅन्डमली ‘सिरो’ सर्व्हेक्षण करण्याचे पत्र राज्याच्या आरोग्य संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सक व महापालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले आहे. याबाबत नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारा देण्यात आली. मात्र, यालाही आठवडा उलटला असतांना अद्याप नियोजन नसल्याल्याने ‘सिरो’ सर्व्हेक्षण केव्हा, असा प्रश्न नागरिकांचा आहे.