शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

२८ शिक्षकांचे बोगस प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:13 IST

अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. अनेक शिक्षकांनी आवडत्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी बोगस दस्तऐवज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन बदल्या : तपासणी मोहीम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या चांगल्याच वादग्रस्त ठरत आहेत. अनेक शिक्षकांनी आवडत्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी बोगस दस्तऐवज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले आहे. आजवर अशा २८ शिक्षकांची बदली प्रस्ताव असल्याचे निष्पन्न झाले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, यामुळे अनेक शिक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.जिल्हा परिषदेच्या जवळपास २ हजार ९८७ शिक्षकांच्या बदल्या वर शिक्कामोर्तब झाले. मात्र, अनेकांनी बोगस दस्तावेज सादर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. याअनुषंगाने शिक्षण विभागाकडून पंचायत समिती स्तरीय चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. चौकशीत या गुरुजींचे पितळ उघडे पडले आहे.पुढील प्रक्रियेत होणारा खोळंबा शिक्षण विभागाला टाळता आला नाही, तर अशा शिक्षकांना नोटीस देऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. त्याची वेतनवाढ रोखण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या खास सूत्राने सांगितले. या शिक्षकांना शिक्षा म्हणून अवघड क्षेत्रात हलविण्याचा प्राथमिक निर्णय झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संवर्ग १ अर्थात विशेष प्रवर्गातील आणि संवर्ग २ म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण यामधील शिक्षकांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. संवर्ग १ प्रवर्गातील शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. संवर्ग २ मधील शिक्षकांच्या बऱ्यापैकी बदल्या झाल्या आहेत. या शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज सादर केले होते. ज्या शिक्षकांनी आॅनलाइन अर्ज सादर केले, त्यांच्या योग्य प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, अधीक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकाºयांची समिती या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या समितीने सर्व दस्तावेजांची कसून चौकशी केल्यानंतर आजघडीला २८ शिक्षकांची फंदफितुरी लक्षात आली आहे.