शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

२७ व्या सब ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपला प्रारंभ

By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST

येथील सॉफ्टबॉल असोशियनच्यावतीने रविवारी २७ व्या अखिल भारतीय सबज्युनियर सॉफ्टबॉल

 अमरावती : येथील सॉफ्टबॉल असोशियनच्यावतीने रविवारी २७ व्या अखिल भारतीय सबज्युनियर सॉफ्टबॉल चॅम्पियनशिपला प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातील २५ राज्यातील मुला-मुलींची चमू दाखल झाली आहे.

येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात १ ते ६ जून दरम्यान आयोजित चॅम्पियनशिपचे उद्घाटन विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांच्या हस्ते करण्यात आले. बनसोड यांच्या हस्ते क्रीडांगणावर नारळ फोडून विधीवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, प्राचार्य स्मिता देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सॉफ्ट बॉल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मा चौंडणकर, सरचिटणीस सूरजसिंग कालेत, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, माणिकराव देशमुख, विद्यापीठाच्या क्रीडा रंजन विभागाचे अविनाश असनारे, क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, अशोक घोगरे आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त बनसोड यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वल करून चॅम्पियनशिपला सुरुवात करण्यात आली.

यावेळी विविध राज्यातून आलेल्या स्पर्धक चमुंनी पाहुण्यांना परिचय करून दिला. सॉफ्ट बॉल चॅम्पियनशिप दररोज सकाळी ७ ते १0 व सायंकाळी ४ ते ७ या वेळात होणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये २५ मुलांच्या तर २२ मुलींचा संघ दाखल झाला आहे. ६ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते सबज्युनिअर चॅम्पीयन ठरलेल्या संघाला मान्यवरांच्या हस्ते बक्षीसाचे वितरण केले जाणार आहे. शनिवारी सायंकाळपासून देशभरातील सॉफ्टबॉल चमू अमरावतीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. (प्रतिनिधी)