शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे २७० पाकिस्तानी हिंदू नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 15:17 IST

पाकिस्तानातील तब्बल २७० हिंदू शुक्रवारी गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे नतमस्तक झाले. ते एक महिन्याच्या व्हिसावर भारत भ्रमण करीत आहेत.

ठळक मुद्देभारतातील अनेक धार्मिक स्थळांना भेटीराष्ट्रसंतांच्या विचारांनी भारावले

अमित कांडलकर/

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : पाकिस्तानातील तब्बल २७० हिंदू शुक्रवारी गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे नतमस्तक झाले. ते एक महिन्याच्या व्हिसावर भारत भ्रमण करीत आहेत.पाकिस्तानी नागरिक असलेले हिंदू दुपारी ४ वाजता गुरुकुंज आश्रमात लाल रंग असलेल्या ट्रॅव्हल्सने आले. सर्वप्रथम त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ गाठले. खास पठाणी पहेरावातील हा जत्था पाहून महामार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. पण, सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारे वंदनीय तुकडोजी महाराज आणि अनेक धर्म-संप्रदायाचे नियमित येणारे गुरुदेवभक्त यामुळे त्यांचा हा समज काही क्षणात दूर झाला. यावेळी त्यांच्यासोबत रायपूर येथील शदानी मंडळाचे महंत युधिष्ठीर लाल, अमरावतीचे माजी उपमहापौर चेतन पवार, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी, अध्यात्म विभागप्रमुख राजाराम बोथे, दिलीप कोहळे, उद्धवराव वानखडे, धीरज इंगळे, अरविंद राठोड व शेकडो सिंधी बांधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रार्थना मंदिर, ध्यानयोग मंदिर, अस्थिकुंड, मध्यवर्ती सभागृह आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांना वंदनीय तुकडोजी महाराजांचे कार्य आपल्या खास शैलीतून दिलीप कोहळे यांनी समजावून सांगितले. गुरुकुंज भेटीतून प्रचंड आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी शेरेबुकात लिहिली. यावेळी आपल्या शेजारी देशातील नागरिकांना पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.भारत माता की जय!महासमाधीपुढे स्थळी नतमस्तक झाल्यावर पाकिस्तानी हिंदूंच्या तोंडून आपसूकच ‘भारत माता की जय’चा उद्घोषणा झाली, हे विशेष. आम्ही पाकिस्तानात राहत असलो तरी रीतिरिवाज कायम आहेत. नुकताच आम्ही होळीचा सण साजरा केला. सोबतच दिवाळीसारखा सणही आम्ही साजरा करतो, असे त्यांनी बोलताना सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज