शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

२६५७ मतदान केंद्र ‘डिसेबल फ्रेंडली’-  जिल्हाधिकारी सौरभ कटियार

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 26, 2023 16:19 IST

विविध उपक्रमांद्वारे नवमतदारांच्या नोंदणीवर भर

अमरावती : जिल्ह्यात मतदानाचा टक्का सर्वाधिक राहावा, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी शत-प्रतिशत नवमतदारांची नोंदणी व्हावी, याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे. सध्या ‘हाऊस टू हाऊस’ बीएलओ जात आहे. मतदाराचे यादीत नाव आहे काय, याची खातरजमा करीत असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आगामी काळ निवडणुकांचा राहणार आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व म्हणजेच २६५७ मतदान केंद्र ‘डिसेबल फ्रेंडली’ राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला निर्देश देण्यात आल्याचेे जिल्हाधिकारी कटियार म्हणाले.निवडणूक विणागाचे अॅपद्वारेही मतदारांना नोंदणी, चुकांची दुरुस्ती करता येते. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येऊन नवमतदारांमध्ये मतदार नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. या कॅम्पमध्ये नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे व याला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.सण-उत्सवादरम्यान स्पर्धा, जनजागृती

मतदान व मतदार नोंदणीसाठी विविध अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी सण-उत्सवांदरम्यान विविध स्पर्धा व उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. यामधील विजेत्यांना पुरस्कारही दिल्या जात आहे. याशिवाय शाळा महाविद्यालयातही विविध स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कटियार यांनी दिली

टॅग्स :ElectionनिवडणूकAmravatiअमरावती