शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जीआयएस सर्वेक्षणासाठी २.६५ कोटी

By admin | Updated: January 25, 2016 00:11 IST

शहरातील मालमत्तांचे जीआयएस बेस प्रणालीने सर्वेक्षण करण्यासाठी नव्याने २ कोटी ६५ लाखांचा आर्थिक भार महापालिका प्रशासनाला सहन करावा लागणार आहे.

स्थायी समितीत प्रस्ताव स्थगित : निविदा न काढता कंत्राट सोपविण्याचा हालचालीअमरावती : शहरातील मालमत्तांचे जीआयएस बेस प्रणालीने सर्वेक्षण करण्यासाठी नव्याने २ कोटी ६५ लाखांचा आर्थिक भार महापालिका प्रशासनाला सहन करावा लागणार आहे. मात्र हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवला असला तरी प्रशासन स्तरावर जीआयएस बेस कंत्राटला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. निविदा प्रक्रिया न राबविता सरळ कंत्राट सोपविल्याविषयी सदस्यांची नाराजी आहे.मालमत्ता करात वाढ करण्याच्या अनुषंगाने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मालमत्तांचे सर्वेक्षण व पुन:करनिर्धारणाचे कामांसाठी कंत्राट सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे येथील सॉफ्टटेक सिस्टिम अ‍ॅन्ड सॉफ्टेवेअर लि. या कंपनीला जबाबदारी सोपविण्यापूर्वी या आतापर्यंत कुठे मालमत्तांचे सर्वेक्षण केले याबाबतचा अहवाल स्थायी समितीत सादर करण्याची सूचना केली. जीआयएस सर्वेक्षण म्हणजे काय?जीआयएस सर्वेक्षणातून सॅटेलाईट फोटोग्रॉफी घेतली जाते. यात रस्ते, नाले, घरे, इमारती, एटीएम, मोबाईल टॉवर, संकुलाचे छायाचित्र वजा इमेज घेतले जाते. सॅटेलाईटने लेअर फॉर्मेशन घेतले जाते. सूक्ष्म सर्वेक्षणाअंती नियोजन ठरविण्यासाठी जीआयएस लाभदायक ठरणारी आहे.सन २०१२ झाले सर्वेक्षणमहापालिका प्रशासनाने यापूर्वी सन २०१२ मध्ये शहराचे जीआयएस बेस प्रणालीने सर्वेक्षण केले होते. त्यावेळी सर्वेक्षणाचा कंत्राट दीड कोटी रुपयांना देण्यात आला होता. मात्र या जीआयएस सर्वेक्षणाचा महापालिका प्रशासनाला काही लाभ झाला काय? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. २०१२ मध्ये सर्वेक्षणाची वाट लागली असताना नव्याने २.६५ कोटी रुपये त्याच कंपनीला सर्वेक्षणाच्या नावे देण्याचा डाव रचला जात असल्याची ओरड आहे