शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

२६ ग्रामसेवक आदर्श पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:44 IST

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील २६ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने तर ३ विस्तार अधिकाऱ्यांना आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : तीन विस्तार अधिकाऱ्यांचाही गौरव, दोन वर्षातील पुरस्काराचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील २६ जणांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने तर ३ विस्तार अधिकाऱ्यांना आदर्श विस्तार अधिकारी पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सभापती जयंत देशमुख, सीईओ मनीषा खत्री, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विनय ठमके, पंचायत विभागाचे डेप्युटी दिलीप मानकर, नारायण सानप, माया वानखडे, बीडीओ दीपक पतंगराव, ग्रामसेवक युनियनचे विभागीय उपाध्यक्ष बबनराव कोल्हे, जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे, सरचिटणीस आशिष भागवत उपस्थित होते. यावेळी २०१५-१६ मधील १२ आणि २०१६-१७ मध्ये १४ याप्रमाणे २६ जणांचा व तीन विस्तार अधिकाºयांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मान चिन्हाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला नितीन गोंडाणे, जयंत देशमुख, डेप्युटी सीईओ नारायण सानप, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष कमलाकर वणवे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दिलीप मानकर, संचालन प्रदीप बद्रे व आभार प्रदर्शन दीपक पतंगराव यांनी केले. यावेळी विजय उपरीकर, जयंत गंधे अशोक थोटांगे, दीपक बांबटकर, माडीवाले, जयंत गोफने, राजू ठाकरे, नीलेश देशमुख, सुदेश तोटेवार, उद्धव वानखडे, राजू ठाकरे, संजय पोहेकर, श्रावण अंभोरे, रवी हेलोडे, सुनील शिराळकर यांनी सहकार्य केले.हे ठरले पुरस्काराचे मानकरीजिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे सन २०१५-१६ मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त करणाºयांमध्ये विनोद मनवर (मोर्शी), माया डोईफोडे (चिखलदरा), योगेश्र्वर उमप (अचलपूर), सुरेंद्र वानखडे (धामणगाव रेल्वे), संजय चव्हाण (भातकुली), अजय देशमुख (चांदूर बाजार), नरेंद्र मेहरे (अमरावती), साहेबराव वानखडे (दर्यापूर), भाष्कर गिद (चांदूर रेल्वे), राजेश भडांगे (वरूड), सुनील मोंढे (तिवसा), सी.व्ही. नवले (अंजनगाव सुर्जी) यांचा समावेश आहे. सन २०१६-१७ मधील पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांमध्ये नीलेश सूर्यवंशी (मोर्शी), नरेंद्र काळे (चिखलदरा), वैशाली कोठवार (अचलपूर), अनिल गावीत (धामणगाव रेल्वे), अमोल आडे (धारणी), अनिता जोल्हे (भातकुली), किशोर उल्हे (चांदूर बाजार), सुनील तिडके (अमरावती), आर.एम.लोखंडे (दर्यापूर), विलास ढेंबरे (चांदूर रेल्वे), भूषण बान्ते (तिवसा), किशोर सानप (नांदगाव खंडेश्र्वर), पी.बी.भुंबरकर (अंजनगाव सुर्जी), जी.एन.भांगे (वरूड) यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय उकृष्ट विस्तार अधिकारी पुरस्काराने विठ्ठल जाधव, पांडुरंग उलेमाले आणि सुधाकर भिमगडे यांचा सन्मान करण्यात आला.