लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच दुपारी १२ पर्यंत २५ .११ टक्के मतदान झाले. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मतदानाची गती जवळपास सारखीच असल्याचे दिसून आले. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात २५.६२ टक्के, अकोला २३.३२, वाशिम २५.८१, बुलडाणा २४.४० व यवतमाळ जिल्ह्यात २५.९२ टक्के मतदान झाले. दुपारी मोठ्या प्रमाणात मतदान केद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. सर्वाधिक मतदान केंद्रे व मतदार अमरावती जिल्ह्यात असल्याने येथे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक प्रयत्न करीत आहेत. बहुतेक बूथवर फिजिकल डिस्टन्समुळे मतदारांची रांगदेखील मोठी दिसत आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात २५ .११ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:07 IST