महापालिकेला ठेंगा : खासगी संस्थांकडेही अर्धा कोटीअमरावती : एरवी पाच -दहा हजारांच्या कर थकबाकीसाठी सर्वसामान्यांच्या घरावर जप्ती आणणारे शासकीय विभाग महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास कशी टाळाटाळ करतात, हे महापालिकेतील बड्या थकबाकीदारांच्या नावावर कटाक्ष टाकल्यास सहजरीत्या लक्षात येते. महापालिकेचा आर्थिक डोलारा पूर्णपणे मालमत्ताकरांवर अवलंबून असताना शासकीय विभागाने सुमारे अडीच ते ३ कोटींचा कर ठकविल्याने महापालिका आर्थिक संकटात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य विभागप्रमुखांनी कोट्यवधी रुपयांची ही थकबाकी अदा करून महापालिकेचा आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि कर अधिकारी महेश देशमुख यांनी केले आहे. महापालिकेचा कर चुकविण्यास जिल्ह्याचा महसूल विभाग अव्वल स्थानी आहे. पालिकेचा कर थकविण्यात शासकीय कार्यालयांसह शिक्षणसंस्था पुढे असल्याचे वास्तव उघड झाले आहे.३१ मार्च २०१७ ला चालू आर्थिक वर्ष संपत असताना महापालिकेसह महसूल आणि अन्य यंत्रणेने वसूलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेला तर नगरविकास विभागाने १०० टक्के वसुलीचे लक्ष्य दिले आहे. त्यासाठी विशेष वसुली शिबिर घेण्याचे निर्देश देऊन प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार महापालिकेने बड्या थकबाकीदारांची यादी काढली असून त्यात महसूल आणि अन्य शासकीय विभागाकडे थकीत असलेल्या कोट्यवधी रुपयांचा समावेश आहे.महापालिकेला यंदाच्या आर्थिक वर्षात ४१ कोटी रुपये मालमत्ता कर अपेक्षित असला तरी मार्च अखेरिस ३२ कोटींच्या आसपास मालमत्ता कराचा आकडा जातो. मात्र यंदा दोन ते अडीच महिने निवडणुकीच्या धामधुमीत गेल्याने मालमत्ता कर वसुलीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे हाती असलेल्या २० -२२ दिवसांमध्ये २४ कोटी प्लस आणखी ८ कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य महापालिकेला गाठायचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या शासकीय सुतगिरणीकडे तब्बल १.२९ कोटी रुपये कर थकीत आहे.त्यापाठोपाठ एसआरपीएफकडे ५७.९४ लाख रुपये थकले आहेत.या बड्या थकबाकीधारकांना 'डिमांड नोटीस' पाठविण्यात आल्या असून कर व मुल्यनिर्धारण अधिकारी महेश देशमुख हे त्यासाठी एसआरपीएफ कार्यालयातही जावून आले आहेत.मात्र एसआरपीएफच्या समादेशकाने त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)अमरावती क्लबकडे ४.७६ लाख अमरावती क्लब कडे ४.७६ लाख ,शंकरराव वानखडे (महसूल)-३६७४६ रु,प्रेमसिंग राजवाडे (महसूल)-१८३०९ रु,जिल्हा प्रकल्प अधिकारी नागरी विकास यंत्रणा -६६२३५,जिल्हाधिकारी उद्दिष्ट साध्य -७१३६६ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(जिप कामे)-६०७३७ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(लघुसिंचन े)-७६४९५ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(चाईल्ड प्रोजेक्ट )-४०८९६ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(मुरलीधर शिंदे )-१२४७८ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(गोडाऊन)-२६७३७ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(सह्यांद्री उपहारगृह)-५६६४७ रु,विशेष भूसंपादन अधिकारी(महसूल कर्मचारी संघटना)-९१५१८ रु,जिल्हाधिकारी (माहिती व सुविधा केंद्र )-६६७४५ रुपये मालमत्ता कर थकीत आहे.बडे थकबाकीधारक शासकीय सुतगिरणी -१.२९ कोटी, एसआरपीएफ- ५७.९४ लाख, जिल्हा न्यायालय- २.३० लाख ,विभागीय आयुक्त वसाहत -२९.६७ लाख, एनसीसी भवन -१२.५० लाख, विदर्भ महाविद्यालय -१६.५० लाख, शिवाजी शिक्षण संस्था -७.५१ लाख आर्थिक डोलारा मालमत्ताकरावर अवलंबून आहे. बड्या थकबाकीदारांनी थकीत रकमेचा भरणा केल्यास महापालिकेस सहकार्यच होईल. अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी प्रसंगी जप्तीची कारावाई करण्यात येईल.- हेमंत पवार, आयुक्त ,महापालिका
शासकीय कार्यालयांकडे २.५० कोटींची थकबाकी
By admin | Updated: March 8, 2017 00:14 IST