अमरावती : जागतिक वन्यजीव सप्ताहात आय क्लिन अमरावतीच्या २० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून छत्री तलावातून २५ पोते भरून प्लास्टिक कचरा व निर्माल्य बाहेर काढले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.महात्मा गांधी जयंती व जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून आय क्लिन अमरावती व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे अभियान राबविण्यात आले. यामध्ये छत्री तलावातील कचरा स्वच्छ करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. सदस्यांनी छत्री तलावातील पाण्यात उतरून प्लास्टिकच्या पिशव्या गोळा केल्या. गणेश विसर्जन व व दुर्गा विसर्जनाच्या वेळी गोळा झालेले निर्माल्य या उपक्रमांतर्गत बाहेर काढून कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात आय- क्लीन अमरावतीचे सदस्य शंतनू पाटील, शिवानी रोडे, अभिषेक कातरे, तुषार गुमळे, तन्मय गुमळे, श्रवण चांडक, गौरी तिखिले, वैष्णवी सालबर्डे, साक्षी पवार, रेवती सोनोन आदिंसह नागरिकांनीही हिरीरीने सहभाग घेतला.
छत्री तलावातून काढला २५ पोते प्लास्टिक कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:41 IST
जागतिक वन्यजीव सप्ताहात आय क्लिन अमरावतीच्या २० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून छत्री तलावातून २५ पोते भरून प्लास्टिक कचरा व निर्माल्य बाहेर काढले.
छत्री तलावातून काढला २५ पोते प्लास्टिक कचरा
ठळक मुद्देआय-क्लीन अमरावतीचा उपक्रम : जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य