शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

६० बालकांचा ‘टू-डी इको’, २५ जणांना आढळला हृदयविकार

By उज्वल भालेकर | Updated: July 16, 2024 18:46 IST

Amravati : जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी, लवकरच होणार शस्त्रक्रिया

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे मंगळवारी हृदयाचा त्रास होत असलेल्या ६० बालकांचे टू-डी इको करण्यात आले. यामध्ये २५ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असून, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी आरबीएसकेअंतर्गत मोफत हृदयविकार शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात टू-डी इको तपासणी शिबिर राबविण्यात आले.

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याचे वेळीच योग्य निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. लहान मुलांनाही जन्मत:च हृदयविकार होतात. यामध्ये त्यांच्या हृदयाला छिद्र असणे, श्वास घेण्यास त्रास होणे, धाप लागणे यांसारखी लक्षणे असतात. त्यामुळे अशा बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे वेळीच निदान करून मोफत उपचार केले जातात. हृदयविकार आजाराचे निदान करण्यासाठी ‘टू-डी इको’ हे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या टू-डी इको मशीनवर मंगळवारी हृदयाचा त्रास जाणवत असलेल्या ६० बालकांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये ३० बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांवर लवकरच मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या वेळी रुग्णांची तपासणी आचार्य विनोबा भावे रुग्णालय येथील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू गोमासे यांनी केली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी डॉ. शंतनू गोमासे यांचे रुग्णालयाच्या वतीने स्वागत केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडवू उपस्थित होते. तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी आरबीएसके जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नीलेश पुनसे तसेच संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

टॅग्स :Amravatiअमरावती