शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२४ टक्के जादा दराने कंत्राट, शहर अंधारात

By admin | Updated: July 2, 2014 23:10 IST

शहरातील पथदिवे देखभाल दुरूस्तीचा कंत्राट २४ टक्के जादा दराने येथील मे. ब्राईट इलेक्ट्रॉनिक कंपनीकडे सोपविण्यात आला. तरीदेखील अनेक वस्त्यांमध्ये पथदिवे बंंद असून काळोखात जनतेला राहावे

अमरावती : शहरातील पथदिवे देखभाल दुरूस्तीचा कंत्राट २४ टक्के जादा दराने येथील मे. ब्राईट इलेक्ट्रॉनिक कंपनीकडे सोपविण्यात आला. तरीदेखील अनेक वस्त्यांमध्ये पथदिवे बंंद असून काळोखात जनतेला राहावे लागत आहे. कंत्राटदारावर प्रशासानाचा अंकुश नसल्याने लोकप्रतिनिधींच्या तक्रारीलाही जुमानत नसल्याची ओरड आहे.मागील १५ ते २० वर्षांपासून याच कंत्राटदाराकडे पथदिवे देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १० टक्के नैसर्गिक वाढीनुसार हा कंत्राट आता २४ टक्के जादा दराने देण्याची किमया महापालिकेच्या प्रकाश विभागाने केली आहे. पूर्वी पथदिवे देखभाल दुरूस्तीचा कंत्राट झोननिहाय सोपविण्यात आला होता. झोननिहाय कंत्राट असल्यामुळे पथदिवे देखभाल दुरूस्तीवर नियंत्रण राहायचे. मात्र आता एकाच कंत्राटदाराकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने मर्जीनुसार कामकाज सुरू असल्याची ओरड नगरसेवक हमीद शद्दा, प्रदीप हिवसे, प्रदीप बाजड, राजेंद्र तायडे आदींची आहे. पथदिवे देखभाल, दुरूस्ती कंत्राटाच्या अटी, शर्तीनुसार कंत्राटदाराने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनीच बंद असलेले पथदिवे शोधून काढणे, त्यानंतर हे पथदिवे सुरू करणे असे करारात नमूद आहे. मात्र बंद पथदिवे शोधण्याची जबाबदारी नगरसेवक स्वत: करीत आहे. बंद पथदिव्यांच्या खांबाचा नंबर दिल्यानंतरही आठ ते दहा दिवसांपर्यंत हे पथदिवे सुरू होत नाही, असा गलथान कारभार ब्राईट इलेक्ट्रॉनिकचा आहे. १८ वाहने या कामासाठी दाखविले जातात. वास्तविक दहा ते बारा वाहनांवरच पथदिवे देखभाल दुरूस्तीचे कामकाज सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने प्रतिस्पर्धी संपविण्यासाठी गतवर्षी प्रकाश विभागाला मॅनेज करून १४ टक्के वाढीव दराने कंत्राट घेतला. हा कंत्राट देण्यामागे बरेच अर्थकारण झाल्याचेही बोलले जात आहे. पथदिवे दुरूस्तीचा साठा नसताना दरमहिन्याला १७ ते १८ लाख रूपयांचे देयके प्रकाश विभागाकडून प्रस्तावित केले जातात. त्यामागे बरेच काही दडल्याचे दिसून येते. कंत्राटदाराच्या कामाचे लेखापरीक्षण होत नाही. त्यामुळे कंत्राटदार करेल त्या पद्धतीने पथदिवे देखभाल, दुरूस्तीचा कारभार सुरू आहे. या कंत्राटात झालेला गैरव्यवहार आणि प्रकाश विभागातील अधिकाऱ्यांची मिलीभगत हे आयुक्तांनी शोधून काढणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)