शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

जिल्ह्यात २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: September 25, 2014 23:16 IST

जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत गुरुवारी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे, अमरावती व अचलपूर मतदारसंघात प्रत्येकी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मोर्शी,

अमरावती : जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत गुरुवारी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे, अमरावती व अचलपूर मतदारसंघात प्रत्येकी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मोर्शी, बडनेरा व दर्यापूर मतदारसंघात प्रत्येकी १, तिवस्यातून ३ उमेदवारांनी ६ तर मेळघाट मतदारसंघात ३ उमेदवारांनी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले.धामणगाव रेल्वे मतदारसंघात गुरुवारी पाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यात काँग्रेसतर्फे वीरेंद्र जगताप, भारिप-बमसंच्या नीलम देविदास रंगारकर, आंबेडकर रिपब्लिकन पक्षातर्फे बाळकृष्ण नामदेवराव जाधव तर अपक्ष योगेश उर्फ काका कावडे, पुंडलिक देवीदास मून यांचा समावेश आहे. यापूर्वी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ६४ इच्छुकांनी ११० उमेदवारी अर्जांची उचल केली आहे.मेळघाट मतदारसंघात आज गुरुवारी तीन उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले. यात काँग्रेसतर्फे केवलराम काळे, भाजपतर्फे प्रभुदास भिलावेकर तर रजनी बेलसरे यांनी उमेदवारी अर्जांचे दोन संच दाखल केले. एक काँग्रेसतर्फे तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. केवलराम काळे व राजकुमार पटेल या दोघांंनी उमेदवारी अर्जांची उचल केली आहे.मोर्शी मतदारसंघात गुरुवारी सुनिता धोंडुजी कुमरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. आतापर्यंत एकूण तीन अर्ज दाखल झाले. यात बसपतर्फे ज्ञानेश्वर माधव राऊत व भारतीय दलित काँग्रेसतर्फे कैलास कचरुजी वानखडे यांनी अर्ज दाखल केला. गुरुवारी १३ इच्छुकांनी २५ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ५७ जणांनी ९७ अर्जांची उचल केली आहे.बडनेरा मतदारसंघात गुरुवारी रमेश किसन आठवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.