शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२३ स्वास्थ्य निरीक्षकांना ‘शो-कॉज’

By admin | Updated: February 4, 2017 00:11 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीची गती मंदावल्याने स्वास्थ्य निरीक्षक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

'डेडलाईन' डोक्यावर : वैयक्तिक शौचालय अपूर्णचअमरावती : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीची गती मंदावल्याने स्वास्थ्य निरीक्षक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आयुक्त हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम ही त्रयी हा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी आग्रही असताना अधिनस्थ यंत्रणा कामचुकारपणा करीत असल्याचे या नोटीसच्या निमित्ताने उघड झाले आहे.महापालिकेच्या पाचही प्रशासकीय झोनमधील २३ स्वास्थ्य निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील वैयक्तिक शौचालयाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच असमाधानकारक असल्याने संबंधित स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक यांचा उलटटपाली खुलासा मागवावा, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना केली आहे. मार्च २०१७ पर्यंत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष यंत्रणेने ठेवले आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत (नागरी) शहरातील पाचही प्रभागात वैयक्तिक शौचालयांची उभारणी सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात फिल्डवर काम करणारे स्वास्थ्य निरीक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक या उभारणीकडे लक्ष देत नसल्याचे निरीक्षण शेटे यांनी नोंदविले आहे. विशेष म्हणजे क्यूसीआय पथकाने १७ ते १९ जानेवारीदरम्यान केलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षणावेळी वैयक्तिक शौचालयाची संपूर्ण कामे २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होतील, अशी ग्वाही यंत्रणेकडून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही पाच झोनमधून ३५६१ शौचालयाची बांधकाम पूर्ण झालेली नाहीत. यात झोन १ मधील ७३८, झोन २ मधील ४९३, झोन ४ मधील ६४४, झोन ४ मधील ६८० व झोन पाच मधील सर्वाधिक १००६ अपूर्ण शौचालयांचा समावेश आहे. वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास गेल्यावर शहर हागणदारीमुक्त घोषित केले जाणार आहे. मात्र वैयक्तिक शौचालयाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने ३१ मार्चपर्यंत लक्ष्यपूर्ती होईल का? याबाबत यंत्रणेमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने पाचही प्रशासकीय झोनमधील २३ स्वास्थ्य निरिक्षक व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांकडून खुलासा मागण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)