शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच महिन्यात २३ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 22:53 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली.

आॅनलाईन लोकमतअमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोप यामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे दुर्दैवी चित्र कायम आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यात २३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. गेल्या दीड दशकात यंदाच्या जानेवारीत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.दुष्काळ, नापिकी यामूळे वाढलेले सावकारी व बँकांचे कर्ज यांसह अन्य कारणांमुळे शेतकºयांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. मुलामुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसं, या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शी अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ३१ जानेवारी २०१८ पावेतो ३ हजार ३४५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये १ हजार ३७० प्रकरणे पात्र, १ हजार ९२७ अपात्र, तर ४८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. गतवर्षी जिल्ह्यात २७१ शेतकरी आत्महत्या झाल्या. यामध्ये जानेवारी महिन्यात १९, फेब्रुवारी २४, मार्च ३०, एप्रिल १४, मे १७, जून २१, जुलै २५, आॅगस्ट २७, सप्टेंबर ३२, आॅक्टोबर २३, नोव्हेंबर १३ व डिसेंबरमध्ये २४ शेतकरी आत्महत्या झाल्या.२००१ पासून ३,३४५ शेतकरी आत्महत्याजिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येते. त्यानुसार आतापर्यत ३ हजार ३४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्दैवी आहे २००१ मध्ये ११ प्रकरणे होती. २०१६ मध्ये ३४९, तर २०१७ मध्ये २७१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.