शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

२३ इमारती अतिधोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 21:58 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्यात एकूण ८० इमारतींचा समावेश आहे. गतवर्षी ही संख्या १०० झाली होती. यंदा २३ इमारती अति धोकादायक आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीचा वापर थांबवून त्या रिकाम्या कराव्यात आणि धोकादायक बांधकाम पाडावे, अशा आशयाची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६७ इमारती शिकस्त : पाणी, वीज बंद करण्याबाबत नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून, त्यात एकूण ८० इमारतींचा समावेश आहे. गतवर्षी ही संख्या १०० झाली होती. यंदा २३ इमारती अति धोकादायक आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारतीचा वापर थांबवून त्या रिकाम्या कराव्यात आणि धोकादायक बांधकाम पाडावे, अशा आशयाची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली आहे.शासन परिपत्रकाप्रमाणे शिकस्त इमारतींचे चार प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार ‘सी वन’ या प्रकारात मोडणाऱ्या अति धोकादायक इमारतींचा आकडा २३ आहे. यात सर्वाधिक १६ अति धोकादायक इमारती राजापेठ झोनमध्ये आहेत. इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती या सी २ ए या प्रकारात एकूण १४ इमारती, तर इमारत रिकामी न करता दुरुस्ती प्रवर्गात मोडणाºया सी २ बी या प्रकारातील एकूण २९ इमारती शहरात आहेत. १४ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्याची नोटीस सी ३ या प्रवर्गात मोडणाºया इमारतींना पाठविण्यात आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर पाचही प्रशासकीय झोनप्रमुखांनी शिकस्त इमारतींची यादी बनवून संबंधितांना नोटीस पाठविल्या आहेत. राज्यात दरवर्षी पावसाळ्यात जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे या इमारतीबाबत काय कारवाई करावी, याबाबत नगरविकास विभागाने शासननिर्णय काढून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अति धोकादायक इमारती संबंधित मालकांनी स्वत:हून पाडाव्यात, अशी नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यापैकी न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता, अन्य इमारतींचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत मजीप्रा व महावितरणला पत्र देण्यात आल्याची माहिती प्रभारी शहर अभियंता जीवन सदार यांनी दिली.असे आहेत आदेश‘सी वन’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या रहिवासी प्रकारातील इमारतींना महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३५४ अन्वये नोटीस बजावून इमारत निष्कासित करावी. इमारत रिकामी करण्यापूर्वी त्यामधील भाडेकरू, सदनिकाधारक यांच्या ताब्यात असलेले चटई क्षेत्रफळ मोजून त्याप्रमाणे प्रत्येक भाडेकरू, सदनिकाधारक व मालक, सहकारी संस्थास तसे प्रमाणपत्र देण्यात यावे.असे आहे वर्गीकरणसी वन - अति धोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या.सी २ ए - इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या.सी २ बी - इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गात मोडणाऱ्या.सी ३ - इमारती किरकोळ दुरुस्ती प्रवर्गात मोडणाऱ्या.