शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २२४ अनधिकृत धार्मिक स्थळांची नोंद

By admin | Updated: January 12, 2015 22:43 IST

शहरात जातीधर्माच्या नावावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या २२४ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ही अनधिकृत धार्मिक स्थळे मनुष्यामध्ये तेढ

अमरावती : शहरात जातीधर्माच्या नावावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या २२४ असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ही अनधिकृत धार्मिक स्थळे मनुष्यामध्ये तेढ निर्माण करणारी ठरत असताना ती केव्हा हटविली जाणार, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना उपस्थित केला आहे. अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबत राजकीय हस्तक्षेपामुळे महापालिका प्रशासन हतबल असल्याचे चित्र आहे.सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन फॉर लिव्ह टु सिव्हील अपिल क्र. ८५१९/२००६ मधील निर्देशाच्या अनुषंगाने शासन निर्णय क्रमांक सीटीएम ०९०९/प्र.क्र. ५५८/(भाग-२)/विशा - १ ब, गृह विभाग, दि. ५ मे २०११ नुसार अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम निष्काषित, नियमित व स्थलांतरित करण्याकरिता महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक २९ डिसेंबर २०१४ रोजी पार पडली. शहरात २९ सप्टेंबर २००९ नंतर अनधिकृत ४० धार्मिक स्थळे असल्याचे सकृतदर्शनी अहवाल महापालिकेने या समितीकडे सादर केला. ही सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. जाती-धर्माच्या नावाखाली उभारण्यात आलेली ही धार्मिक स्थळे समुहाने निर्माण केल्याने महापालिकेला नोटीस बजाविताना कोणाच्या नावे ही नोटीस बजवावी हा प्रश्न उभा राहतो. विशेष धर्मियांचे अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचा प्रयत्न केला तर अन्य धर्मियांच्या असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळाकडे बोट दाखविल्या जाते. याच श्रृंखलेत शहरात विविध अनधिकृत धार्मिक स्थळे २२४ च्यावर निर्माण झाली आहे. गत आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबतची कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी अन्यथा प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाई करण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अरूण डोंगरे यांनी महानगरातील पाचही झोनमध्ये असलेले अनधिकृत अनेक धार्मिक स्थळांची चाचपणी सुरू केली आहे. शहरात एकही अनधिकृत धार्मिक स्थळ राहणार नाही या अनुषंगाने ती हटविण्याची रणनीती आखली जात आहे. ही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविताना महापालिका प्रशासन तगडा पोलीस बंदोबस्त सोबत ठेवणार आहे. (प्रतिनिधी)