पाच हजार चौरस फूट अतिरिक्त बांधकाम : संरक्षण भिंत पाडण्याचे आदेशअमरावती : स्थानिक कठोरा मार्गावरील रंगोली मंगल कार्यालय व लॉनचे पाच हजार चौरस फूट अतिरिक्त बांधकामाप्रकरणी २२ लाख रुपये दंड वसुलीची नोटीस गुरुवारी बजावण्यात आली आहे. तसेच अतिक्रमित संरक्षण भिंत तीन दिवसांत पाडण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. जनविकासचे नगरसेवक नितीन देशमुख यांच्या मालकीचे रंगोली मंगल कार्यालय, लॉनची मोजणी ३ दिवसांपूर्वी झाली. आयुक्तांच्या कारवाईने खळबळअमरावती : मोजणीचा अहवाल सहायक संचालक नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी गुरुवारी आयुक्तांसमोर ठेवला. त्यानुसार आयुक्तांनी पाच हजार चौरस फूट अतिरिक्त बांधकामाप्रकरणी २२ लाख रुपयांची दंडात्मक रक्कम वसुलीसाठी नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रंगोली मंगल कार्यालयाच्या संचालकांच्या नावे ही नोटीस उशिरा बजावल्याची माहिती आहे. तसेच मंगल कार्यालयाच्या संरक्षण भिंतीचे अतिक्रमित बांधकाम पाडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
‘रंगोली’ला २२ लाखांच्या दंडाची नोटीस
By admin | Updated: October 9, 2015 00:45 IST