कोंबून नेली जाणारी २२ जनावरे पकडली दोन आरोपींना अटक : शिरजगाव पोलिसांची कारवाई, खरपी चेकपोस्टवरील घटना परतवाडा : बहिरम येथील आरटीओ चेकपोस्टनजीक ट्रकमध्ये कोंबून नेली जाणारी जनावरे पकडण्यात आली. ही घटना रविवारी घडली. गुप्त माहितीवरून आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने शिरजगावचे ठाणेदार कवाडे यांनी आरटीओ खरपी नाका येथे ही कारवाई केली. ट्रक क्र. आर.टी. ०२ जी.एम. ५०२ या ट्रकमध्ये जनावरे ताडपत्रीमध्ये बांधलेली दिसून आली. २२ बैल कत्तलीच्या उद्देशाने ट्रकमधून वाहून नेण्यात येत होते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अधिक्रमांक ५/ए/१९ व प्राणी अत्याचार प्रतिबंधक अधि. ११/१ सह सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम६६/१९२ मोटर वाहन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली. ही जनावरे गौरक्षण संस्थेत पाठविण्यात आली आहेत. एएसआय शिंदेंसह पोलीस कर्मचारी जलील, उईके कारवाईत सहभागी झाले.
कोंबून नेली जाणारी २२ जनावरे पकडली
By admin | Updated: December 26, 2016 00:22 IST