शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ रुग्ण; दूषित रक्त, लैंगिक संबंधातून संसर्ग 

By उज्वल भालेकर | Updated: April 27, 2023 18:54 IST

जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राने दिली आहे.

अमरावती : जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राने दिली आहे. चाचण्या वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्याही वाढलेली आहे. ‘हिपॅटायटीस-बी’च्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ५४ गर्भवती महिला, १५ कारागृातील कैदी, तर १३ एचआयव्हीग्रस्तांचाही समावेश आहे.

देशात यकृत बिघडण्याचे सर्वाधिक दिसून येणारे कारणे म्हणजे, ‘हिपॅटायटीस बी’ हे आहे. हा हिपॅटायटीस विषाणू बऱ्याच प्रकारे शरीरात प्रवेश करू शकतो. दूषित रक्त पुरवठा, तसेच असुरक्षित लैंगिक संबंधातून हा विषाणू मोठ्या प्रमाणावर पसरत असून, या विषाणूची लागण क्षमता ही एचआयव्ही विषाणूपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे हिपॅटायटीस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे २०१९ मध्ये हे केंद्र सुरू झाले असून, या केंद्राला राज्यातील मॉडेल केंद्राचा दर्जाही देण्यात आल्याची माहिती रुग्णायल प्रशासनाने दिली.

हिपॅटायटीसचे एकूण पाच प्रकारहिपॅटायटीस विषाणूचे एकूण पाच प्रकार आहेत. यामध्ये ‘हिपॅटायटीस-ए’ हा दूषित पाणी किवा दूषित अन्नामुळे पसरतो. ‘हिपॅटायटीस-बी’ हा दूषित रक्त, लैंगिक संबंध, दुसऱ्या व्यक्तीने वापरलेली सुई, ब्लेडच्या वापरामुळे होतो. एचआयव्हीबाधित, गर्भवती महिला व डायलिसिस रुग्णांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. ‘हिपॅटायटीस-सी’ हा रक्ताच्या माध्यमातून होतो, संक्रमित रुग्णांची लाळ, वीर्य किवा योनिमार्गातील द्रव पदार्थातून याचा संसर्ग पसरतो. ‘हिपॅटायटीस-डी’ हा विषाणू ‘हिपॅटायटीस-बी’ असलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो. तर ‘हिपॅटायटीस-ई’चा संसर्ग सौम्य आणि अत्यंत कमी काळाकरिता होतो. शासकीय रुग्णालयांत मोफत उपचारहिपॅटायटीसचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये मोफत तपासणी व मोफत औषधोपचार केले जातात. राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राअंतर्गत या सुविधा पुरविल्या जातात. वर्ष २०२२-२३ मध्ये ‘हिपॅटायटीस-बी’च्या ४१८४२ चाचण्यांमध्ये २१८ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. तर ‘हिपॅटायटीस-सी’च्या १४४१८ चाचण्यांमध्ये १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्र रुग्णालयात सुरू झाल्यापासून ‘हिपॅटायटीस-बी’ व ‘सी’च्या चाचण्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. या विषाणूचे लवकर निदान झाल्यास या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. डॉ. प्रीती मोरे, विशेष भिषक, वर्ग- एक अधिकारी, इर्विन

 

टॅग्स :Amravatiअमरावती