शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२१.५० कोटींवर खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 00:12 IST

जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून १४ तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर ६.५० कोटी रूपयांच्या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे.

६.५० कोटींचा तिढा सुटला : पदाधिकाऱ्यांना भरली धडकीअमरावती : जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीमधून १४ तालुक्यांतील विकासकामांसाठी मंजूर ६.५० कोटी रूपयांच्या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना सोमवारी उशिरा रात्री याबाबतचे आदेश काढले. ६.५० कोटी रूपयांच्या विकासकामांचा तिढा सुटला असला तरी उर्वरित २१.५० कोटी रूपयांसाठी जिल्हा परिषदेतील दिग्गज समोरासमोर उभे ठाकले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आपल्या कार्यक्षेत्रात मोठमोठी विकासकामे करता यावीत, यासाठी जि.प.सदस्यांनी फाईली चालविल्या होत्या. मात्र, याबाबत भाजपच्या मनोहर सुने यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याने सारे मुसळच केरात गेले आहे. झेडपीच्या सर्वसाधारण सभेत जिल्हानिधीतून विकासकामांचे नियोजन करण्यात आले. यानुसार ६.५० कोटींमधून विविध कामे मंजूर केली आहेत. मात्र, ६ जूनच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही, शिवाय निधीचेही समसमान वाटप झाले नाही. त्यामुळे भाजाप सदस्य मनोहर सुने यांनी याबाबत विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. यावर दोनवेळा सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ७ आॅक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांनी हा स्थगिती आदेश खारीज केला. त्याबाबतचे पत्र झेडपी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी २८ कोटींच्या नियोजनातील कामांची शासन धोरणानुसार विस्तृत पडताळणी करून सीईओंना योग्य निर्णय घेण्याचे सूचित केले होते. यावर सीईओंनी अर्जदार आणि गैरअर्जदारांची दोनवेळा सुनावणी घेतली. अंतिम सुनावणी दरम्यान झेडपी प्रशासनाच्या आदेशानुसार लेखाशिर्ष २५-१५ जिल्हा निधीअंतर्गत नियोजित कामांचा कार्यारंभ आदेशावरची स्थगिती विविध अटी व शर्तींना अधीन राहून उठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आठ प्रकारच्या अटी व शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. २५-१५ लेखाशीर्षामध्ये (लोकपयोगी कामे) ६.५० कोटींची २०८ विविध कामे मंजूर करून त्यांना प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली होती. यापैकी जवळपास ३० कामांना यापूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित कामांवरील स्थगिती उठविल्यामुळे यालहान कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे ही ६६ टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्थांना वाटप करण्यात येतात. मात्र, स्थगिती आदेशामुळे वरील संस्था अडचणीत येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन या कामांची विहित प्रक्रिया व कायदेशिर बाबींची पूर्तता केल्यानंतरच अंतिम कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. ६.५० कोटींच्या कामांवरील स्थगिती उठविली असताना डीपीसीने ३०-५४ शिर्षातील २१.५० कोटींच्या कामांवरील स्थगिती कायम ठेवल्यानेस सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची कोंडी झाली आहे. (प्रतिनिधी)कशी सुटणार कोंडी ?जिल्हा नियोजन समितीने विकासकामांसाठी दिलेल्या २१.५० कोटी रूपयांची कामे निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. आगामी निवडणुकीत मतदारांना समोरे जाताना विकासकामांचा आरसा ठेवता यावा, याकरिता मिनीमंत्रालयातील पदाधिकारी व सदस्य सरसावले आहेत. मात्र स्थगिती असल्याने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे मार्गी लावण्यासाठी आता जिल्हा परिषदेचे शिलेदार काय करतात अन् ही कोंडी कशी सोडवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचण जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी ६.५० कोटी रूपयांच्या जिल्हा निधीतील विकासकामांवरील स्थगिती उठविली आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय असलेल्या ३०-५४ या लेखाशीर्षातील २१.५० कोटींच्या कामांवर स्थगिती कायम असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कामे अडकून पडल्याने प्रशासनाच्या आदेशांमुळे पदाधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.