शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२,१४५ कोटी पीककर्जाचे ‘लक्ष्य’

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

जिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

२ लाख ९७ हजार शेतकरी खातेदार : जून २०१६ पर्यंत वाटपाचे शासनाचे निर्देश, सहा कर्ज मेळावे घेण्याच्या सूचनागजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यासाठी सन २०१६-१७ करिता ३ हजार ४७८ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये यंदाच्या खरीप हंगामासाठी २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना १ हजार ७५९ कोटी ४५ लाख रुपये पीककर्ज वाटपाची प्राथमिकता ठेवण्यात आली आहे. याच आराखड्यात रबी हंगामासाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजार रूपये पीककर्ज वाटपाची तरतूद करण्यात आली आहे, असे एकूण २ हजार १४५ कोटी ६८ लाखांचे पीककर्ज दोन्ही हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. सततची नापिकी, दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती यामुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहेत. मागील वर्षीच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी यंदाच्या खरिपाच्या हंगामात बी-बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. शासनाने जिल्ह्यात २३ मार्च रोजी दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दाही दिशेने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी वेळीच पीककर्ज दिल्यास खरीप हंगामाची तयारी करूशकणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १९ मार्च रोजी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्याची बैठक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर बॅँकांचे अधिकारी व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा ८ व ९ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासन गंभीर आहे. मागील वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १ हजार ६९५ कोटी ४४ लाखांच्या खरीप पीककर्जाचे व ३६७ कोटी ७५ लाखांच्या रबी पीककर्जाचे उद्दिष्ट होते. यापैकी ३१ मार्च २०१५ अखेर खरिपाला १ हजार ३७१ कोटी ५० लाख व रबीला ६५ कोटी ९६ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. वाटपाची टक्केवारी ६९ टक्के आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने २ लाख ९६ हजार ९९९ शेतकऱ्यांना खरिपासाठी १७५९ कोटी ४५ लाख ७६ हजारांचे व रबीसाठी ३८६ कोटी २२ लाख २४ हजारांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बॅँकांनी एप्रिल २०१६ पासून खरीप पीककर्ज वाटपाची सुरूवात करावी. हा लक्ष्यांक ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.पीककर्जवाटपासाठी ३० जून ‘डेडलाईन’ बॅँकांनी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात करावी. त्यासाठी बॅँकांना जून २०१६ पर्यंत प्रत्येक महिन्याला दोन याप्रमाणे सहा पीककर्ज मेळावे घेऊन पीककर्ज वाटपाची प्र्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण करावी. महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियानात मेळावे घेऊन पीककर्ज वाटप करावे, या कामात हलगर्जीपणा केल्यास प्रत्येक शाखा व्यवस्थापकास व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी शेतकरी बॅँकेत येतो तेव्हा बॅँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटावे. शेतीसंबंधी योजना समजावून सांगाव्यात व त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, शेतकऱ्यांसाठी बँकाच्या प्रत्येक शाखेने मेळावे घ्यावेत व प्रसंगी महसूल विभागाची मदत घ्यावी, तसेच महाराजस्व अभियानात स्टॉल लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.