शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे दागिने चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

अमरावती : सराफा बाजारात महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. महिलेने ६ ...

अमरावती : सराफा बाजारात महिलेच्या पर्समधील २१ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. महिलेने ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व चांदीच्या तोरड्या पर्समध्ये ठेवल्या होत्या. चैनला डाग लावण्याकरिता त्या सराफा बाजारात गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात महिला चोराने पर्स लंपास केली. सदर महिलेच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000000

वाहतुकीस अडथळा केल्याने तिघांवर गुन्हा

अमरावती : रस्त्यावर ऑटो उभे करून वाहतुकीस अडथळा केल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी तीन चालकांविरुध्द भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला. राजिक हुसैन अखलाल हुसैन (२५ रा. मौलाना आझाद कॉलनी), आदहर खान मजिद खान (२४ रा. रतनगंज) व अभय चरणदास शामकुवर (२९ रा. मिलचाळ, बडनेरा) यांचा आरोपींत समावेश आहे. त्यांना समजपत्रावर सोडण्यात आले.

0000000000000000000000000000

तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी विविध ठिकाणी तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक करून, त्यांच्याजवळील दारूचा मुद्देमाल जप्त केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी संजय गांधीनगरात धाड टाकून दिलीप विठोबा घोडे (६२ रा. संजय गांधीनगर) याच्याकडून ४८० रुपयांची दारू जप्त केली. बडनेरा पोलिसांनी निंभा येथील संदीप देवराव चौधरी याच्या घरी धाड टाकून ५४० रुपयांची दारू जप्त केली. कवठा बहाळे येथील अशोक नारायण माथने (४०) याच्या घरातून ६०० रुपयांची अवैध दारू जप्त केली.