शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम योजनेसाठी २०९ ग्रापंची तपासणी

By admin | Updated: February 18, 2017 00:10 IST

लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेत जिल्ह्य़ातील सर्व ८३९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

आचारसंहितेनंतर निकाल होणार जाहीर : योजनेत ८३९ ग्रा.पं.चा सहभागअमरावती : लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेत जिल्ह्य़ातील सर्व ८३९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच जवळपास २०९ ग्रामपंचायतींचे मूल्यमापन समितीने तपासणी करून पंचायत समितीकडे अहवाल सादर केला आहे.या अहवालाच्या आधारे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींचा निकाल निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जास्तीत जास्त लोकसहभागातून गावकऱ्यांबरोबरच संबंधित पंचायतींना स्वयंपूर्ण करण्यासाठी इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाचा पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन, पंचायतींची विविध करांची वसुली, अंगणवाड्या, शाळांची सजावट, ग्रामसभा, ग्रामसभेतील विविध विकासात्मक ठराव, गावातील विकासाच्या योजना अशी वेगवेगळी उपक्रमे राबवायची आहेत. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या उपक्रमाचाही समावेश आहे. इको व्हिलेजच्या धर्तीवर ही योजना असली तरी इको व्हिलेज केवळ वृक्षारोपणातील मर्यादित आहे. तथापी या स्मार्ट ग्रामयोजनेत लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.गावांना मिळणार दहा लाखांचे बक्षीसग्रामीण खेडे स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यात पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीला शासनातर्फे १० लाखांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या १०० गुणांचे मूल्याकंन करण्यात आले. सुरूवातीला ग्रामपंचायत स्वत: गुणांचे मूल्यांकन त्यानंतर दुसऱ्या तालुक्यातील नेमलेली समिती मूल्यांकन करेल. जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत या पारितोषिकास पात्र ठरवून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असला तरी ही योजना प्रभावी व नियोजनबद्ध राबविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)स्मार्ट ग्राम योजनेच्या तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. त्यासंदर्भात पंचायत समितीकडे प्राप्त अहवाल जिल्हा परिषदेने मागविले आहेत. त्यानुसार योजनेचे अहवाल येत आहेत. त्यानंतर नियमानुसार योग्य कारवाई केली जाईल.- जे. एन.आभाळे, डेप्युटी सीईओ पंचायत विभाग