शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१६२८ घोषित शाळांना २० टक्के वेतन अनुदान

By admin | Updated: August 31, 2016 00:02 IST

घोषित शाळांच्या २० टक्के वेतन अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

१६ वर्षांच्या लढ्याला यश : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयअमरावती : घोषित शाळांच्या २० टक्के वेतन अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १६२८ घोषित शाळांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या मंगळवारी दुपारी १२ वाजता झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण धोरणात्मक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून याबद्दल शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आभार मानलेत. यावेळी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे तात्यासाहेब म्हैसकर, खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, यादव शेळके, पुंडलिक रहाटे, अरुण मराठे, संजू सिंग यासह शिक्षक उपस्थित होते. यासाठी सकाळी १० वाजतापासूनच विधिमंडळासमोर ठाण मांडून बसले होते.या निर्णयामुळे विनाअनुदानित शिक्षकांनी केलेली १६ वर्षांची दीर्घ तपश्चर्या फळास लागली आहे. शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया शेखर भोयर यांनी दिली. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या व अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांच्या त्वरित वेतन अनुदानाची मागणीही केली आहे.परंतु १ व २ जुलै रोजी घोषित झालेल्या शाळा व अनुदानास पात्र ठरलेल्या अघोषित शाळा यांनाही सरसकटच वेतन अनुदान मिळायला हवे होते. घोषित शाळांच्या २० टक्के अनुदानाचा निर्णय हा शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा व समस्त शिक्षणवर्गाच्या अस्मितेचा विजय असल्याची भावोद्गार यावेळी शेखर भोयर यांनी काढले.असा राहिला शिक्षकांचा संघर्ष लढाज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातील ही लढाई दीघकाळ चालली. सन २००४ पासून औचित्याचा मुद्दा, मुंबईच्या आझाद मैदानावर लढाई सुरू असताना शेखर भोयर यांनी १६ मंत्र्यांचे व ६४ आमदारांचे पत्र शासनाला सादर केले होते. त्याचप्रमाणे नागपूर हिवाळी अधिवेशन २०१३ रोजी 'विठ्ठला अजब तुझे सरकार' या घोषणेसह टाळ मृदंगाच्या गजरात अधिवेशनावर मोर्चाही नेण्यात आला. नागपूर येथे चक्काजाम आंदोलन व जेलभरो आंदोनही केले होते.५ ते ८ डिसेंबर २०१६ दरम्यान सेवाग्राम ते नागपूरपर्यंत पायी दिंडी काढून महाराष्ट्रातील हजारो विनाअनुदानित शिक्षक न्यायासाठी १४ दिवस विधानभवनावर एकवटले होते. नंतर १ जून २०१६ पासून महाराष्ट्रातील हजारो विनाअनुदानित शिक्षक न्यायासाठी शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर एकवटले.सरकारने मंगळवारी जाहीर केलेले २० टक्के अनुदान म्हणजे शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा व न्यायाचा विजय आहे. शिक्षकांनी ही पोटापाण्याची लढाई जिंकली आहे.- शेखर भोयर, संस्थापक,शिक्षक महासंघ