शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनांचे २००० बोगस लाभार्थी

By admin | Updated: January 10, 2015 00:07 IST

शेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या विविध निराधार योजनांचे अनुदान मिळवून देणाऱ्या स्थानिक तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश ...

राजेश मालवीय धारणीशेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या विविध निराधार योजनांचे अनुदान मिळवून देणाऱ्या स्थानिक तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्तेंनी दिले आहेत. यामध्ये समाविष्ट दलाल, वयाचे खोटे दाखले देणारे वैद्यकीय अधिकारी, तलाठी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे तब्बल २ हजारच्या जवळपास लाभार्थी असल्याची तक्रार ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तालुक्यातील काही वयोवृध्द लाभार्थ्यांनी दिली होती. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृध्दापकाळ, राजीव गांधी आदी योजना राबविल्या जातात. येथील नायब तहसीलदार, वरिष्ठ, कनिष्ठ, लिपिकांनी दलालांमार्फत २५ ते ४५ वर्षे वयोगटातील शेकडो बोगस लाभार्थ्यांना खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे योजनेचे अनुदान मिळवून दिले. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली.

बोगस कागदपत्रे पुरविणारे रॅकेट सक्रियवयाचे खोटे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालयात बैरागड, हरीसाल, धारणी येथील १० दलालांचे रॅकेट सक्रिय आहे. या दलालांनी नवयुवकांना योजनेत बसविण्यासाठी खोटे दाखले मिळवून देणे, बोगस आधार कार्ड बनविणे, या संपूर्ण प्रकाराला संमती देणारे वैद्यकीय अधिकारी, तलाठी, रक्कम वाटप करणारे बँकेचे व्यवस्थापक, यांचाही या रॅकेटमध्ये समावेश आहे. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास अनेक तथ्य हाती लागू शकतात.